शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

करदात्यांचे पैसे दानधर्मासाठी नको

By admin | Updated: June 10, 2015 04:05 IST

आयुक्तांच्या अधिकारातून खाजगी संस्थेला कार्यक्रमाला दिल्या गेलेल्या निधीचा संताप स्थायी समितीने व्यक्त केला.

नवी मुंबई : आयुक्तांच्या अधिकारातून खाजगी संस्थेला कार्यक्रमाला दिल्या गेलेल्या निधीचा संताप स्थायी समितीने व्यक्त केला. एका संस्थेला मदतनिधी दिल्यास शहरातील इतरही संस्था मदतनिधीची मागणी करतील. त्यामुळे पालिकेच्या करदात्यांचा पैसा हा दानधर्मासाठी नसल्याचे सांगत दिलेली रक्कम अधिकाऱ्यांकडून वसुलीच्या सूचना सभापती नेत्रा शिर्के यांनी केली.फेब्रुवारी महिन्यात वाशी जनविकास प्रबोधिनी संस्थेच्या वतीने झालेल्या चित्रदृष्टी या चित्रपट महोत्सवाला महापालिकेने एक लाख रुपयांचा मदतनिधी दिलेला आहे. मात्र कोणत्याही धोरणात्मक निर्णयाची पूर्तता न करता खर्चाच्या झालेल्या बाबीचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे हे या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनीच मदतीसाठी अर्ज केल्याचे उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सभागृहात सांगितले. त्यांच्या मागणीनुसार फेब्रुवारी महिन्यातच आयुक्त अधिकारातून त्यांना एक लाख रुपये देण्यात आलेले आहेत. त्याच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला असता ही बाब समोर आली. याचा संताप व्यक्त करत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रस्ताव बहुमताने नामंजूर केला. जर या संस्थेला मदतनिधी दिला तर इतरही संस्था मदतनिधीची मागणी करतील याची भीती नगरसेवक मनोहर मढवी व रवींद्र इथापे यांनी व्यक्त केली. तर अधिकाऱ्यांनी परस्पर निधी वाटपाची बाब गंभीर असून ज्या अधिकाऱ्याने ती अदा केली त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची मागणी जयवंत सुतार यांनी सभागृहापुढे केली. नागरी कामांचा निधी मंजूर करण्यासाठी अनावश्यक चौकशा करणारे अधिकारी संस्थांना परस्पर निधी देतात, याचेही आश्चर्य सुतार यांनी व्यक्त केले. तर या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी शंकर मोरे यांनी व्यक्त केली.शहरात सर्वधर्माच्या संघटना कार्यरत असताना पालिकेने केवळ मराठी कार्यक्रमांना धरून चालणार नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी नगरसेविका अपर्णा गवते यांनीही कामगारांच्या वेतनाला विलंब होत असताना आयुक्त अधिकाराचा वापर का करत नाहीत, असा प्रश्नही सभागृहापुढे उपस्थित केला. त्यामुळे चित्रदृष्टी कार्यक्रमाला दिल्या गेलेल्या निधीवरून सभागृहात सुमारे एक तास चर्चा रंगली. या प्रकारावरून सभापती नेत्रा शिर्के यांनीही योजना व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. (प्रतिनिधी)...तर प्रभागात भिख मागो आंदोलनच्चित्रदृष्टीसाठी निधीची मागणी केली असता त्याबाबतचा निर्णय प्रशासनाचा होता. जर आयुक्त अधिकारातून दिलेला निधी स्थायी परत मागत असेल तर सदस्यांच्या प्रभागात भिख मांगो आंदोलन करून त्यांना १ लाख रुपये परत केले जातील, असे चित्रदृष्टीचे आयोजक गजानन काळे यांनी सांगितले.च् इतरही संस्थांच्या पाच लाखांच्या मदतनिधीचे चार प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार केल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे सभापती शिर्के यांनी सांगितले.