शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: October 12, 2016 04:48 IST

नेरळ - माथेरान घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे टॅक्सी चालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नेरळ -माथेरान

नेरळ : नेरळ - माथेरान घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे टॅक्सी चालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नेरळ -माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी संघटनेच्यावतीने एमएमआरडीचे कार्यकारी अभियंता यांना या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाच्या प्रती त्यांनी कर्जतचे तहसीलदार, आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांना दिले होते. परंतु अनेक दिवस उलटूनही या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने त्यांनी १८ आॅक्टोबर रोजी या रस्त्यावर नेरळ ते दस्तुरी नाक्यापर्यंत चक्का जाम करून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.नेरळ -माथेरान घाट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी नेरळ -माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने नेरळ राय हॉटेल येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या रस्त्याकडेप्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने त्यांनी १८ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. माथेरानला जाण्यासाठी नेरळ १ नंबर नाक्यावरून एकमेव रस्ता आहे. परंतु या रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करवा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहने नादुरु स्त होत असून त्याचा आर्थिक भुर्दंड आणि शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातातही होत आहेत. यामुळे टॅक्सी संघटना आक्र मक झाली आहे. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर कोणतीही उपाययोजना करत नाहीत. त्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असून याला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असे यावेळी टॅक्सी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच हा रस्ता तयार करण्याला वनविभागाचा अडथळा येत आहे, असे टॅक्सी संघटनेला एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. परंतु अनेक महिन्यांपासून हे काम सुरू आहे. परंतु या अगोदर या रस्त्याला वनविभागाचा अडथळा नव्हता. परंतु वनविभाग आता का अडथळा आणत आहेत, असे अनेक प्रश्न नेरळ-माथेरान टॅक्सी चालक -मालक संघटनेने उपस्थित केले आहेत. तसेच अनेक ठिकाणी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके, उपाध्यक्ष हनीफ नजे, रवींद्र मिसाळ, कार्याध्यक्ष आनंद कोकाटे, चेतन दिसले, खजिनदार सचिन लोभी, किशोर कराळे, सेक्र ेटरी अर्जुन नाईक, दत्ता जाधव, माजी अध्यक्ष प्रवीण पोलकम, कमलाकर भागीत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)