शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’साठी काँग्रेसला सत्तेत आणा - चव्हाण

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

सामान्य माणसाला जर खरोखरच ‘अच्छे दिन’ हवे असतील तर काँग्रेसला सत्तेवर आणले पाहिजे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आता उन्हातान्हात काम करून

पनवेल : सामान्य माणसाला जर खरोखरच ‘अच्छे दिन’ हवे असतील तर काँग्रेसला सत्तेवर आणले पाहिजे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आता उन्हातान्हात काम करून पक्ष वाढवा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पनवेल येथे पक्ष कार्यकर्त्यांना दिला.पनवेल तालुका काँग्रेस पक्ष व शहर कमिटी कार्यकर्ता मेळावा गुरु वारी पनवेल येथील फडके नाट्यगृहात सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा अध्यक्ष आर.सी.घरत, रमाकांत म्हात्रे, मुश्ताक अंतुले, महिला अध्यक्ष श्रद्धा घरत, रमेश किर व महेंद्र घरत उपस्थित होते. मेळाव्यानंतर तळोजा येथील भाजपा कार्यकर्ते ताहिर पटेल व त्यांचे सहकारी, नेरे विभागातील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करून सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे संगितले.चव्हाण म्हणाले, देशाचे भले करण्यासाठी, प्रगतीसाठी जातीय सलोखा महत्त्वाचा असतो. मात्र तो राखण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. सरकारचा रिमोट कंट्रोल संघाच्या हातात आहे. विद्यमान सरकारमुळे कोणी समाधानी नसल्याचे सांगून केंद्र सरकारच्या विदेश नीतीवरही टीका केली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पक्षाची ताकद वाढवावी, असा सल्ला चव्हाण यांनी दिला. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष सर्व जागा लढवेल, त्यासाठी नव्याने पक्षात आलेल्यांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. भाई जगताप यांनी आपली तात्त्विक व विचार प्रवृत्तीविरूध्द लढाई असल्याचे सांगून पनवेलचा विकास युतीशिवाय होऊ शकतो हे दाखवून द्या, असे संगितले. माजी मंत्री नजिम खान यांनी भाजपा भारत जोडो पार्टी नसून भारत जलाव पार्टी असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार माणिक जगताप व महेंद्र घरत यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर)जिल्ह्यात कोणाबरोबर आघाडी करायची याचा निर्णय जिल्हा व तालुका कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल. ज्या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तेथील निर्णय आधी घेतला जाईल. कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शेकापक्षाने पाठिंबा मागितला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पाठिंबा द्यावा, असे म्हटले आहे. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस