शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयवाढीला स्थगिती

By admin | Updated: February 23, 2017 06:38 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा प्रस्ताव बुधवारी

नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेने फेटाळला. केवळ एकाच विभागातील अधिकाऱ्यांऐवजी सर्वच अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयवाढीचा प्रस्ताव सभागृहापुढे मांडण्याच्या सूचना यावेळी सभागृहाने प्रशासनाला केल्या. परंतु शासनाचा निर्णय केवळ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठीच असल्याचे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. बुधवारी झालेल्या महासभेत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व डॉक्टर यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा प्रस्ताव सभागृहापुढे आला होता. परंतु केवळ आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बाबतीतच हा निर्णय का असा प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांचा त्यात समावेश का नाही असा प्रश्न नगरसेवक संजू वाडे व अनंत सुतार यांनी उपस्थित केला. यावेळी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने शासनानेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीचा निर्णय घेतला असल्याचे पीठासीन अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.यावेळी मागील काही महिन्यात झालेल्या मुलाखतीअंती किती डॉक्टर रु जू झाले यासंबंधी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाकडे चौकशी केली असता, ६५ पैकी केवळ २६ डॉक्टर कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली. यावरून महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. उपलब्ध डॉक्टरांना समाधानकारक वेतन देण्याऐवजी तुटपुंजे मानधन दिले तर कोण काम करेल , असा टोलाही त्यांनी मारला. तर रु ग्णालये सज्ज असतानाही डॉक्टर नसणे ही प्रशासनावर नामुष्की आलेली असल्याचेही ते म्हणाले. परंतु रोस्टर मंजूर नसल्याने आरोग्य व अग्निशमन दलातील कायमस्वरूपी भरती करता येत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर देखील असमाधान व्यक्त करत महापौरांनी सार्वमताने हा प्रस्ताव फेटाळला. (प्रतिनिधी )