शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरमधील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: February 20, 2016 02:10 IST

बेलापूर येथील तरुणाच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरत नातेवाइकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

नवी मुंबई : बेलापूर येथील तरुणाच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरत नातेवाइकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. बेपत्ता महिलेच्या तपासाकरिता पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर काही तासातच या तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याने त्याने पोलिसांच्या भीतीने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.राहुल पाटील (२६) असे मयत तरुणाचे नाव असून तो बेलापूर गावचा राहणारा आहे. गुरुवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सीवूड ते बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर आढळला. रेल्वे अंगावरुन गेल्याने त्याच्या शरिराचे दोन तुकडे झाले आहेत. याप्रकरणी त्याच्या मृत्यूची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर राहुल याचा मृत्यू अपघाती आहे की,आत्महत्या याबाबतचा उलगडा झालेला नाही. परंतु राहुल याने पोलिसांच्या भीतीने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्यांनी राहुलचा मृतदेह एनआरआय पोलीस ठाण्यात नेला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह दीडशेहून अधिक नागरिकांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. अखेर पोलिसांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी अंत्यविधीसाठी मृतदेह नेला.बेलापूर परिसरात राहणारी एक विवाहित महिला १० फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल आहे. तपासादरम्यान ही बेपत्ता महिला राहुलच्या संपर्कात होती अशी माहिती त्यांना मिळाली होती. यानुसार गुरूवारी दुपारी चौकशीसाठी राहुलला बोलावले होते.त्यानंतर तो घरी आला आणि सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुन्हा घराबाहेर गेला. त्यानंतर काही तासाने त्याच्या मृतदेहाची माहिती घरच्यांना मिळाली. पोलिसांनी चौकशीदरम्यान दमदाटी केल्याच्या भीतीने राहुलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबीयांनी केला आहे. (प्रतिनिधी)