शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीमने बुडविले २९ कोटी

By admin | Updated: August 30, 2016 02:29 IST

मनोर-वाडा-भिवंडी रस्त्यांच्या कामासाठी वापरलेली माती, खडी, व रेती या गौण खनिजापैकी ७ लाख ५० हजार ब्रास गौणखनिजांच्या स्वामित्वधनाची सुमारे २९ कोटी

हितेन नाईक,  पालघर मनोर-वाडा-भिवंडी रस्त्यांच्या कामासाठी वापरलेली माती, खडी, व रेती या गौण खनिजापैकी ७ लाख ५० हजार ब्रास गौणखनिजांच्या स्वामित्वधनाची सुमारे २९ कोटी रुपयांची रक्कम ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने बुडविल्याचा सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांचा आरोप खरा ठरला असून तिच्या वसुलीची प्रक्रिया पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु झाली आहे. जर आताच्या तरतुदीनुसार दंडाची रक्कम वसूल केल्यास ती सुमारे १४५ कोटी इतकी होऊ शकते.सुप्रीम इन्फ्रा.प्रायव्हेट लिमिटेडच्या ठेकेदाराने मनोर-वाडा-भिवंडी या ३८० कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम हाती घेतले होते. या रस्त्याच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या रेती, माती, खडी इ, गौण खनिजापोटीचे स्वामित्वधन संबंधित ठेकेदाराने भरलेलेच नसल्याची तक्रार ते अनेक वर्षांपासून शासनाकडे करीत आले होते. मात्र, ती रक्कम वसूल करण्यास वरिष्ठ पातळी वरून चालढकल केली जात होती. कोकण विभागीय आयुक्तांनी १८ जुलै रोजी पत्र देऊनही दंडाची रक्कम वसूल केली जात नसल्याने त्या व इतर मागण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्या नंतर महसूल विभाग कामाला लागला आहे. कोकण आयुक्तांनी या संबंधी चौकशी केल्या नंतर या कामासाठी पालघर, वाडा, भिवंडी या तालुक्यातील ६ लाख ७५ हजार ७४४ ब्रास माती, ३ लाख २१ हजार ९३६ ब्रास खडी,व २२ हजार ७८ ब्रास रेती वापरण्यात आल्याचे म्हटले आहे. या पैकी ठेकेदाराने १ लाख ८० हजार ब्रास माती व ४७ हजार १५० ब्रास खडीच्या स्वामित्वधनाची रक्कम सरकारकडे जमा केली आहे. तर ४ लाख ५३ हजार १४४ ब्रास माती, २ लाळ ७४ हजार ७८६ ब्रास खडी व २२ हजार ७८ ब्रास रेती इतक्या गौण खनिजाची रक्कम बुडविली आहे. या संदर्भातील चौकशी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे व पालघर यांनी कोणतीही माहिती सादर केली नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ शासनाची काट्यावधी रुपयाचे फसवणूक करण्यात सार्वजनिक बांधकाम ठाणे आणि पालघर विभागाचे अधिकारी सामील असल्याचे दिसून येत आहे.