शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

शुभमचा यशस्वी समुद्र प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 02:17 IST

नेरूळमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शुभम वनमाळी या तरुणाने नवी मुंबई शहराच्या शिरपेचायत मानाचा तुरा रोवला

नवी मुंबई : नेरूळमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शुभम वनमाळी या तरुणाने नवी मुंबई शहराच्या शिरपेचायत मानाचा तुरा रोवला. स्पेन आणि दक्षिण आफ्रिका यांना जोडणाऱ्या जिब्राल्टरची सामुद्रधुनी अवघ्या ३ तास १६ मिनिटांमध्ये पार करून विश्वविक्रम केला. शुभमच्या या १६.७ कि.मी. प्रवासाची नोंद सोमवारी लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून, यापूर्वी ३ तास २० मिनिटांच्या विक्रमाला जिद्दीने टक्कर देऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. अशा प्रकारचा विश्वविक्रम करणारा हा मुंबई शहरातील पहिलाच जलतरणपटू असून, सर्वच स्तरामधून त्याचे अभिनंदन केले जात आहे.यापूर्वी २१ जानेवारी २०१४ ला शुभमने धरमतर ते गेट वे आॅफ इंडिया हा प्रवास १२ तास ४२ मिनिटांत पार करून जलतरणाच्या कसबाने नवी मुंबई शहराचे नाव उंचावले होते. जिब्र्राल्टरची सामुद्रधुनी तेरेफा (स्पेन) त मोरक्को (साऊथ आफ्रिका) असा दुहेरी प्रवास सलग पोहून पार केला. शुभमच्या या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे डोवर, लंडन ते तेरेफा स्पेनपर्यंत सलग १२ तासांच्या प्रवासानंतर त्वरित या प्रवासाला सुरुवात केली होती. विविध अडचणी व परिस्थितींवर मात करून १५ डिग्री अंश सेल्सिअस अशा थंड प्रदेशातील पाण्यात पोहून त्यांने जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू होण्याचा मान मिळविला. शार्क व व्हेल यांसारख्या जलचरांची भीती असूनही शुभमने न डगमगता सलग पोहून जिद्दीने जलप्रवास पूर्ण केला. जोराने वाहणारे वारे, बदलता सागरीप्रवाह अशी आव्हाने पेलली.पोहताना प्रदूषित पाणी, मासे, लाटा, वाऱ्याचा वेग, शारीरिक इजा या सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतो. यशाचे शिखर गाठण्यासाठी या अडथळ््यांक डे दुर्लक्ष करून माझा जलप्रवास मला यशस्वीरीत्या कसा पारकरता येईल, याकडे लक्ष केंद्रित करतो.- शुभम वनमाळी, जलतरणपटू