शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बनवलेली ‘सोलर कार’

By admin | Updated: March 3, 2016 02:52 IST

अंजुमन-ए-इस्लाम टेक्निकल कॅम्पसच्या काळसेकर कॉलेजमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे.

वैभव गायकर,  पनवेलअंजुमन-ए-इस्लाम टेक्निकल कॅम्पसच्या काळसेकर कॉलेजमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे. इलेक्ट्रिकल सोलर व्हेइकल कॉम्पिटिशनच्या वतीने आयोजित आशिया स्तरावरील भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेतील अभियांत्रिकी क्षेत्रातील १०१ महाविद्यालयांच्या प्रकल्पांची स्पर्धा यामध्ये रंगली होती. यात काळसेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारने पहिल्या तीन फेऱ्या जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे.२५ ते २९ मार्चदरम्यान भोपाळच्या आरएमपी रेसिंग ट्रॅक वर आशियाई स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. या प्रकल्पाचे मार्गदर्शक व फॅकल्टी प्रतिनिधी असलेले प्रोफेसर अव्वाब फक्की हे आहेत. सोलर कारच्या प्रकल्पात एकूण २२ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमणात वायू प्रदूषण होते. सोलर कार ही सौरऊर्जेवर चार्ज होत असते. कारवर बसविलेले सोलर पॅनल हे सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ४ या कालावधीत सौर किरणामार्फत चार्ज होईल. चार्ज झाल्यानंतर ही कार सुमारे १ ते २ तास चालणार आहे.गाडीचा स्पीड २५ ते ३० कि.मी. असणार आहे. तीन माणसे या कारमध्ये बसू शकतात. पूर्णत: पर्यावरणपूरक कार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. ओझोनचा कमी होणारा थर, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता या कारची निर्मिती करण्यात आली आहे.