शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एलएलएम सीईटी मराठीतून घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह

By admin | Updated: May 26, 2017 00:28 IST

एलएलएम अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर अर्ज करतात. त्यांच्या सोयीसाठी ही सीईटी मराठीतून घेण्याची गरज आहे

प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एलएलएम अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर अर्ज करतात. त्यांच्या सोयीसाठी ही सीईटी मराठीतून घेण्याची गरज आहे. शिवाय एलएलएम अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जात असला तरी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मराठी भाषेतून लिहिण्याची मुभा दिली जात असताना प्रवेशाकरिता घेण्यात येणारी सीईटी इंग्रजीतून का द्यावी, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. याबाबत कुलगुरूंना रीतसर पत्र सादर करण्यात आले आहे. येत्या ३ जून रोजी एलएलएम प्रवेशाकरिता सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिता अर्जाची मुदत संपली असून विद्यार्थ्यांना हॉलतिकिटाचेही वाटप करण्यात आले आहे. सीईटीचे यंदाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे. कायद्याच्या अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध करिअरच्या संधी पाहता या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाकडे एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ६०० जागांसाठी तब्बल २ हजार ८०२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एलएलएम सीईटीसाठी फक्त १७०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र यावर्षी ही संख्या हजारांनी वाढली आहे. लॉ अभ्यासक्रमाकडे वाढत असलेला हा कल प्रामुख्याने उपलब्ध झालेल्या नोकऱ्यांच्या पर्यायांमुळे असल्याचे बोलले जात आहे. लॉ शाखेत मास्टर्स कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एलएलएम करण्याकडे कल वाढला आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमामुळे सध्या तरी जागा वाढवणे शक्य नाही. यासाठी कॉलेज स्तरावर हा कोर्स सुरू करण्याची गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या लॉ अ‍ॅकॅडमीचे डॉ. अशोक येंडे यांनी व्यक्त केले.