शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

लोह बोर्डाची रक्कम लुबाडणाऱ्यांना अटक

By admin | Updated: February 22, 2017 06:56 IST

लोह बोर्डाची बँकेतील ठेवीची रक्कम हडप करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने

नवी मुंबई : लोह बोर्डाची बँकेतील ठेवीची रक्कम हडप करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे. त्यांनी २०१४ मध्ये बनावट खात्याद्वारे बोर्डाचे अडीच कोटी रुपये हडप केले होते. ही बाब सप्टेंबर २०१६ मध्ये निदर्शनास आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.बॉम्बे आयर्न अ‍ॅण्ड स्टील लेबर बोर्ड (लोह बोर्ड)ची व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक शाखेच्या कक्ष दोनने चौघांना अटक केली आहे. महेश उतेकर, राजेंद्र शेळके, पद्माकर चव्हाण व प्रभाकर मुसळी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कळंबोली येथील आंध्रा बँकेत लोह बोर्डाच्या नावे बनावट खाते उघडले होते. त्यानंतर बोर्डाची बनावट कागदपत्रे तयार करून उमेश टोले नावाच्या व्यक्तीला बोर्डाचे अधिकार भासवून ठेवीचे अडीच कोटी रुपये बनावट खात्यामध्ये जमा केले. यानंतर त्यांनी ही रक्कम काढून घेऊन पोबारा केला होता; परंतु २०१४मध्ये घडलेला हा प्रकार २०१६मध्ये बोर्डाच्या निदर्शनास आला. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांकडे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने तपासाला सुरुवात केली होती. त्यानुसार पाच महिन्यांच्या तपासाअंती चौघांना अटक करण्यात यश आल्याचे पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले. त्याकरिता तपास पथकाला बनावट बँक खात्यापासून तपासाला सुरुवात करावी लागली. यादरम्यान बोर्डाच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यासाठी वापरलेले नाव व छायाचित्र भिन्न असल्याचे समोर आले. मात्र, अधिक सखोल तपासात ते छायाचित्र महेश उतेकर याचे असल्याचे उघड झाले. यामुळे त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता, संपूर्ण प्रकार उघडकीस आला. उतेकर हा चालक असून त्याने रियल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तिघांच्या मदतीने हा अपहार केला होता. बोर्डाची ठेवीची रक्कम ही माथाडी कामगारांशी संबंधित होती; परंतु या चौघांपैकी कोणीही माथाडी कामगार किंवा बोर्डाशी संबंधित नाही. तरीही त्यांना लोह बोर्डाच्या ठेवीची माहिती मिळाली कुठून याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. शिवाय, ज्या बँकेत बोर्डाची ठेवीची रक्कम होती, त्याच बँकेच्या एकाच शाखेत बोर्डाच्या नावे बनावट खाते त्यांनी उघडले होते. त्यामुळे या प्रकरणात इतरही कोणाचा समावेश आहे का? याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाच महिन्यांच्या तपासाअंती चौघांना अटक करण्यात यश आल्याचे पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले. त्याकरिता तपास पथकाला बनावट बँक खात्यापासून तपासाला सुरुवात करावी लागली. यादरम्यान बोर्डाच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यासाठी वापरलेले नाव व छायाचित्र भिन्न असल्याचे समोर आले.