शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी बोला; पण मराठी भाषेला सोडू नका- कवी अरुण म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:39 IST

पनवेलमध्ये मराठी भाषा गौरवदिनाचे आयोजन

पनवेल : बोली भाषांत मराठी भाषेला जगात मानाचे स्थान आहे. मराठी भाषक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला; पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे. ती माणसाला मोठेच बनवते, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी अरुण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल मराठी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या वतीने बुधवारी महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन समारंभ आयोजित केला होता.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर होते, तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री नयन पवार, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, अ‍ॅड. चंद्रकांत मढवी, कवियत्री जोत्स्ना रजपूत, स्मिता गांधी, मंदाकिनी हांडे, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. सोनू लांडे, प्रा. प्रवीण गायकर आदी उपस्थित होते. मराठी भाषादिन हा अभिमान जागवण्याचा दिवस आहे. मराठी साहित्यात वि. वा. शिरवाडकर यांचे नाव अजरामर आहे, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या सूचनेवरून मराठी भाषादिन साजरा करण्याची सुरुवात झाल्याची माहिती कवी म्हात्रे यांनी या वेळी दिली. अक्षराच्या दुनियेत आजच्या तरुण पिढीने जर झोकून दिले तर त्यांची भविष्यातील स्वप्न पूर्ण होतील. पुस्तके वाचली पाहिजेत. उत्तम भाषा ही संवाद घडू शकते, त्यामुळे बारावीपर्यंत मातृभाषा सक्तीचे करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, जीवन जगण्यासाठी कविता, साहित्य स्फूर्ती देतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कवींचे साहित्य प्रेरीत करते. अनेकांना जीवनात अडचणी येतात, तेव्हा कविता प्रेरणादायी ठरतात. समाजात चांगल्या साहित्याची निर्मिती होत असताना तरुणांनीही साहित्य लिहिले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण गायकर यांनी केले. उपस्थितांचे आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनू लांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले.