शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 00:02 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे

नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणीगळती व चोरीची चाौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी नवी मुंबईमधील पाण्याच्या उधळपट्टीविषयी व पाणी गळतीविषयी लक्षवेधी मांडली होती. दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या लक्षवेधीवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. स्वच्छतेविषयी नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. परंतु पाण्याच्या नियोजनात मात्र पालिका अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने मोरबे ते कळंबोली व पूर्ण शहरात पाइपलाइन टाकली आहे. परंतु यानंतरही प्रचंड पाणीगळती सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यास प्रशासनास अपयश आले आहे. दहा वर्षांत पालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा म्हात्रे यांनी दिला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकली आहे. परंतु नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर जुने पाइप काढले का, ते कुठे आहेत? अद्याप दिघा व इतर काही परिसरांत पुरेसे पाणी मिळत नाही. स्काडा सिस्टीम सुरू नाही. प्रशासनाने स्काडा सुरू असल्याचे दाखविल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे आव्हानही त्यांनी दिले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही शहरातील पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सर्व नगरसेवकांच्या मतांचा विचार करून प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या.