शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीची कत्तल, याचिका दाखल करा; संरक्षण समितीकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:54 IST

दास्तान फाट्यावर ४५०० वृक्षांचे नुकसान

नवी मुंबई : उरण तालुक्यामधील दास्तान फाटा येथे पाणथळ जमीन व खारफुटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. येथील महामार्गासह इतर कामे थांबविण्यात येऊन पर्यावरणाचे नुकसान थांबवावे, असे आदेश खारफुटीच्या संरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीने दिले आहेत; परंतु यानंतरही प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नसल्यामुळे संबंधितांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दास्तान फाटा येथे रुंदीकरणासाठी पाणथळ जमिनीवर खोदकाम केले आहे. येथील खारफुटीला मिळणारे खाडीचे पाणी थांबविण्यात आले आहे. यामुळे साडेचार हेक्टर जमिनीवरील तब्बल ४५०० खारफुटीचे वृक्ष सुकले आहेत. पाणथळ जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पक्षी व इतर जैवविविधतेचे नुकसान झाले आहे.पर्यावरणाची हानी थांबविण्यात यावी. खारफुटी नष्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. नेचर कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार, श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार व पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीचे दिलीप कोळी व इतर पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी एका वर्षापासून जेएनपीटी, महामार्ग प्राधिकरण महसूल विभाग व राज्य शासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. खारफुटीच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीकडेही याविषयी तक्रार केली होती. समितीने दास्तान फाट्यावरील कामे थांबविण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. पर्यावरणाचे नुकसान थांबविण्याचे आश्वासन जेएनपीटी व महसूल विभागासह महामार्ग प्राधिकरणाने दिले होते; परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही.पर्यावरणाचे नुकसान थांबविले जात नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खारफुटी संरक्षण समितीकडेही याविषयी निवेदन दिले आहे. जेएनपीटी, महसूल विभाग व महामार्ग प्राधिकरणाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे, यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. खारफुटी संरक्षण समितीचे सदस्य स्टॅलीन डी यांनीही समितीच्या बैठकीची मागणी अध्यक्षांकडे केली असून, या बैठकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवस्मारकासाठी खोदकाम परवानगी नाहीजेएनपीटीने उरणमधील दास्तान फाटा येथे शिवस्मारक केले आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या खोदकामासाठी परवानगी घेतली होती का? अशी माहिती श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी माहितीच्या अधिकारामध्ये विचारली होती. स्मारकाच्या कामासाठी खोदकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे उत्तर उरण तहसीलदारांनी दिले आहे. यामुळे अवैधपणे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधितांवरही कारवाईची मागणी केली आहे.