शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
2
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
3
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
4
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
5
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
6
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
7
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
8
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
9
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
10
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
11
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
12
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
13
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
14
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
15
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
16
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
17
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
18
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
19
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
20
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."

साजगाव ग्रामपंचायतीचे सहा सदस्य अपात्र ?

By admin | Updated: February 20, 2016 02:06 IST

खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता भांडीलकर यांचे सरपंचपद व सदस्यपद कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी रद्द केल्यानंतर आणखी सहा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे

खोपोली : खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता भांडीलकर यांचे सरपंचपद व सदस्यपद कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी रद्द केल्यानंतर आणखी सहा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये उपसरपंच नितीन देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पाच सदस्यांचा समावेश आहे. कोकण आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याने साजगावच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.दोन कंपन्यांना बेकायदा ना हरकत दाखले दिल्याप्रकरणी साजगावच्या सरपंच सविता भांडीलकर यांचे सरपंचपद व सदस्यपद कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी रद्द केले आहे. शिवसेनेचे सदस्य चिंतामण चव्हाण यांनी या प्रकरणी तक्र ार दाखल केली होती. कोकण आयुक्तांनी या तक्र ारीची गंभीर दखल घेत भांडीलकर यांना अपात्र केले आहे. या घटनेने सत्ताधारी राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात खळबळ उडाली असतानाच सरपंच सविता भांडीलकर यांच्या प्रकरणात कागदपत्र तपासल्यानंतर बहुमताच्या जोरावर उपसरपंच नितीन देशमुख व अन्य पाच सदस्यांनी चुकीचे ठराव केल्याचे निदर्शनास आल्याने कोकण आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. साजगाव ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ११ सदस्यांपैकी सत्ताधारी गटाकडे ५ तर विरोधी गटाकडे ६ सदस्य आहेत. विशेष म्हणजे उपसरपंचपद विरोधी गटाकडे आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर सरपंचांना आर्थिक व्यवहार करण्यास मज्जाव करणारा ठराव उपसरपंच व अन्य ५ सदस्यांनी केला होता. शिवाय स्मशानभूमीच्या जागेतील अतिक्र मण काढण्यासाठी नियमबाह्य ठराव करण्यात आल्याचे कोकण आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने उपसरपंच नितीन देशमुख, सदस्य चिंतामण चव्हाण, मंगला शेलार, निलेश पाटील, संगीता जाधव, पुष्पा भगत यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ (१) नुसार कार्यवाही करण्याकरिता चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.या प्रकरणात चौकशी करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी २२ फेबु्रवारीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या सदस्यांच्या विरोधात कुणीही तक्र ार केलेली नाही.