शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सायन-पनवेल महामार्ग ठप्प

By admin | Updated: June 26, 2017 01:41 IST

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या पावसाने रविवारी दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पडलेल्या पावसाने ठिकठिकाणचे रस्ते बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या पावसाने रविवारी दमदार हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पडलेल्या पावसाने ठिकठिकाणचे रस्ते बंद केले होते. तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. सायं. पनवेल महामार्गही या वेळी ठप्प झाल्याचे दिसून आले. पनवेल तालुक्यात १०० मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने देहरंग धरणाची पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याचे दिसून आले. सायन-पनवेल महामार्गावर मात्र वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. पाचपदरी महामार्गावरील सुमारे ३ पदरी रस्ता पाण्यात गेल्याने पुन्हा एकदा सायन-पनवेल महामार्गाच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. १५०० कोटी रु पये खर्चूनही या महामार्गावर पाण्याचा निचरा योग्यरीत्या होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या महामार्गावर सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टोल वसूल करते. मात्र, पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचण्याची नित्याचीच समस्या बनली आहे. आज खारघर, कळंबोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणाहून जात आहेत. मात्र, या ठिकाणी साचलेल्या पाण्याने काही प्रमाणात वाहतुकीचा वेग मंदावला होता. सततच्या पावसाने काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याचे पाहावयास मिळाले. कामोठे येथील नौपाडा गावात १५ ते २० घरांत पाणी शिरल्याने येथील गावकऱ्यांची धावपळ झाली. खारघरमधील फरशिपाडातील घरात पाणी साचले. पनवेल शहरातही काही सखल भागात पाणी साचल्याचे पाहवयास मिळाले.