शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा

By admin | Updated: February 16, 2016 02:44 IST

नैना प्रकल्पबाधितांच्या मागण्या ६ महिन्यांत पूर्ण केल्या नाही तर सिडकोचे काम बंद पाडू, असा इशारा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सिडकोस दिला.

पनवेल : नैना प्रकल्पबाधितांच्या मागण्या ६ महिन्यांत पूर्ण केल्या नाही तर सिडकोचे काम बंद पाडू, असा इशारा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सिडकोस दिला. विविध मागण्यांसाठी खारघर रेल्वे स्थानक ते बेलापूर असा मोर्चा सोमवारी नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीने काढला. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, भीमशक्ती आदी पक्षांनी एकत्रित सिडकोविरोधात हा मोर्चा काढला होता.या मोर्चाचे नेतृत्व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील सर्व गावे ही संभाव्य महापालिकेत समविष्ट करून घ्यावीत, अशी मागणीदेखील करण्यात आली. पनवेल तालुक्यामधील १११ गावांमधील शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पातील धोरणाला विरोध केला आहे. विरोधासाठी शेतकऱ्यांनी उत्कर्ष समितीची स्थापना केली. नैना प्रकल्पामधील धोरणानुसार एकूण संपादित जमिनीपैकी ६० टक्के जमीन प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून मिळणार आहे. उर्वरित ४० टक्के जमीन सिडको पायाभूत सुविधांसाठी वापरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी ७० टक्के प्रकल्पग्रस्तांना व ३० टक्के सिडकोला जमीन देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सिडकोने २५ एकरांऐवजी ५ एकर जागेला १.७ एफएसआय लागू केला जावा, अशीही मागणी केली आहे.गावठाण हद्दीत २.५ चा एफएस आय मिळावा, सार्वजनिक जागा, गावाशेजारील शासकीय जागा गावासाठीची मैदाने, सभागृहे, उद्याने अशा कामासाठी आरक्षित असावी, शेतकऱ्यांसाठी डेव्हलपमेंट चार्ज लागू करू नये, ग्रामपंचायतीच्या परवानगीनुसार सध्या अस्तित्वात असणारी बांधकामे अधिकृत करावी, नैना प्रकल्पामध्ये इको-सेन्सेटिव्ह झोनमधील जमिनी समाविष्ठ करण्यात याव्यात, विरार- वसई - अलिबाग १२० मीटर रस्त्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागेसाठी २ चा एफएसआय मिळावा, अशा मागण्या आहेत. यावेळी शेकापचे बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, काशिनाथ पाटील मोर्चात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)