शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत भाटिया यांच्या बदलीच्या वृत्ताने अस्वस्थता

By admin | Updated: March 7, 2016 02:40 IST

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. असे असले तरी सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत

कमलाकर कांबळे,  नवी मुंबईसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. असे असले तरी सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत मात्र या वृत्ताने अस्वस्थता पसरली आहे. कोणत्याही स्थितीत भाटिया यांची बदली होऊ नये, असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे.शिस्तप्रिय व कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून भाटिया यांची ओळख आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती होऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यकाळात भाटिया यांनी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली आहे. जमीन घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या या महामंडळाची प्रतिमा सुधारण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जमीन संपादन, त्याबदल्यात द्यावयाचा मोबदला, निविदा प्रक्रिया क्लिष्ट वाटणारे हे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. आता केवळ विमानतळाची आर्थिक पात्रता दर्शविणारी निविदा काढणे शिल्लक आहे. विमानतळाबरोबरच देशातील पहिली स्मार्ट सिटी आणि नैना प्रकल्पाच्या विकासाचे काम भाटिया यांनी हाती घेतले आहे. हे सर्व प्रकल्प हाताळताना भाटिया यांनी सिडकोतील आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतले. कर्मचाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. गेल्या चाळीस वर्षांच्या इतिहासात सिडकोत असे प्रथमच घडल्याने भाटिया यांनी आणखी काही काळ सिडकोत कार्यरत राहावे, अशी अधिकारी व कर्मचारीवर्गाची भावना आहे. या महिन्याच्या अखेरीस भाटिया यांना सिडको सेवेत तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांची बदली अटळ असल्याचे मानले जात आहे. परंतु या नियमालाही अपवाद आहेत. सिडकोने हाती घेतलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाटिया यांना मुदतवाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची सुप्त इच्छा आहे.