शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

खारघरमध्ये स्थलांतरित सायबेरियन सँडपायपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:27 IST

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने दिला दुजोरा

-  वैभव गायकरपनवेल : खारघरमध्ये एका पक्षी निरीक्षकाला नुकताच सायबेरियात आढळणारा दुर्मीळ सँडपायपर पक्षी आढळला आहे. खारघर शहराला निसर्गाचे वेगळे वरदान लाभले आहे. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी खारघर हिल, शहरालगतच्या खाडीकिनारी आढळत असतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेनेही संबंधित पक्षी येथे स्थित असल्याला दुजोरा दिला.पक्षिनिरीक्षक नरेशचंद्र सिंग यांना हा सायबेरियन सँडपायपर सर्वप्रथम नोव्हेंबरमध्ये शहरातील सेंट्रल पार्कच्या प्रस्तावित दुसऱ्या टप्प्यात आढळला होता. अधिक माहिती मिळविल्यावर त्यांच्या लक्षात आले की हा पक्षी स्थलांतरित असून तो मूळ सैबेरियात आढळतो. हिवाळ्यात मोठ्या संख्येने हे पक्षी हवामान बदलासाठी भारतात येतात. खाडीकिनारी, समुद्रकिनारी या पक्षाचे वास्तव्य असते. खाडीकिनारी चिखलात आढळणारे किडे या पक्षाचे मुख्य खाद्य आहे. नवी मुंबईमधील टी. एस. चाणक्यजवळील खाडीकिनारी असलेल्या तलावालगत सर्वप्रथम हा पक्षी फेब्रुवारी महिन्यात निदर्शनास आला होता. तेव्हा बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे शास्त्रज्ञ मृगक प्रभू यांनी या पक्षाला टॅग लावला होता. खारघर शहराला मोठा खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनारी १०० ते १५०च्या आसपास विविध प्रजातींचे पक्षी आढळत आहेत. यामध्ये ७ पक्षांच्या प्रजाती अत्यंत दुर्मीळ असल्याची माहिती पक्षी निरीक्षक नरेशचंद्र सिंग यांनी दिली.खाडीवरील भराव चिंतेचेखारघर शहराला लाभलेल्या खाडीकिणारी सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात भराव सुरू आहे. काही डेब्रिजमाफिया भराव टाकून ही नैसर्गिक पाणथळे नष्ट करीत असल्याने ही बाब चिंतेची असल्याचे मत नरेशचंद्र सिंग यांनी व्यक्त केली आहे.पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करावेखारघर शहराला लाभलेली नैसर्गिक साधनसंपदा लक्षात घेता पक्षी निरीक्षणासाठी या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित करण्याची गरज आहे. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या नैसर्गिक पाणथळींचे जतन करण्याची आवश्यकता आहे.