शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभापतीपदी शुभांगी पाटील

By admin | Updated: May 24, 2017 01:48 IST

स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या ऋचा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या ऋचा पाटील यांचा ९ विरूद्ध ७ मतांनी पराभव केला. काँगे्रसने आघाडी धर्माचे पालन करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. गत वर्षीच्या पराभवाचा डाग पुसण्यात यश आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर फटाके वाजवून विजयाचा जल्लोष केला. महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. गतवर्षी काँगे्रसच्या मीरा पाटील यांनी शिवसेनेला मतदान केल्याने व राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मतदानाचा अधिकार नाकारल्याने स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे गेले होते. पुन्हा पराभवाची पुनरावृत्ती होवू नये यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सभापतीपदाचा उमेदवार ठरविण्यापासून काँग्रेसकडून पुन्हा बंडखोरी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. तुर्भे येथील नगरसेविका शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे शिवसेनेमध्ये सदस्य निवडीवरूनच दोन गट निर्माण झाल्याने सभापती पदाच्या निवडणुकीकडे पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी दुर्लक्ष केले. महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार संजीव नाईक, सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, आदींनी सभापतींचे अभिनंदन केले.