शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन क्रीडा संकुल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 01:09 IST

आश्वासन विरले हवेत : दोन महिने उलटूनही कामे ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्क दिघी : श्रीवर्धन तालुक्याचे बोर्लीपंचतन येथील क्रीडा संकुल येत्या दोन महिन्यात पूर्ण करणार, असे नेहमीच सांगण्यात येते; मात्र डिसेंबरनंतरही दोन महिने उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाली नसल्याचे समोर आले आहे.

श्रीवर्धनच्या क्रीडा संकुलाचे ३ मे २०१३ रोजी भूमिपूजन करण्यात आले व २०१४ साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या कामाचे कंत्राट श्रीवर्धनमधील सिरोया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. क्रीडा खात्यामार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे टप्प्याटप्प्याने आजपर्यंत ५५ लाख रुपये वर्ग झाले आहेत. मागील वर्षभर क्रीडा संकुलाचे काम बंद आहे. भूमिपूजनानंतर काम ६ वर्षे सुरू असल्याने ठेकेदाराचे अन्य ठिकाणी काम चालू असल्याने येथील कामाकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराशी आर्थिक हितसंबंध तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. गेल्या सात वर्षांपासून श्रीवर्धनमधील क्रीडा संकुलचे काम सुरू आहे; मात्र अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. हे काम पूर्णत्वास केव्हा जाणार, असा प्रश्न परिसरातील क्रीडा प्रेमींना पडला आहे. ठेकेदारास सार्वजनिक बांधकाम खाते पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.

श्रीवर्धन येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्रीकांत गणगणे यांच्याशी याबाबत बोलले असता, क्रीडा संकुलसाठी १ कोटी आल्याचे सांगितले; मात्र कामे अद्यापही सुरू झाली नाहीत, हे विचारले असता करू, बघू, असे बोलत कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही.

मंत्र्यांची पाठ, अधिकारी सुसाटमंत्री आले की त्यांच्या भोवती वही घेऊन फिरण्याची अधिकाऱ्यांची जुनी पद्धत. बैठकीत काही नोंदी टिपून घेणे आणि बैठक संपल्यावर मात्र अधिकारी त्याकडे 'वेळे'नुसार आणि 'निधी'नुसार लक्ष देतात, हे आता जगजाहीर आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी असेच केले असावे, असे बोलले जाते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई