शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘महिला विशेष’ला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:43 IST

पूर्वीच्या वेळेत लोकल सोडा : महिलांनी केल्या मागण्या; जेवढी आसनव्यवस्था तेवढेच प्रवासी घ्या

डोंबिवली : मध्य रेल्वेवरील लोकलना होणारी गर्दी विचारात घेऊन तसेच महिलांच्या मागणीनुसार सहा महिन्यांनंतर गुरुवारपासून पुन्हा महिला विशेष लोकल सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी या लोकलला महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. कल्याणहून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सुटलेल्या या लोकलमध्ये डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांत फारशा महिला चढल्या नाहीत, असे सांगण्यात आले.

‘महिला विशेष’चा गुरुवारी पहिलाच दिवस असल्याने महिलांना या लोकलबाबत माहिती नसावी. अजून आठवडाभर अंदाज घेऊन या लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात मागणी करायची की नाही, हे ठरवणार असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेतर्फे सांगण्यात आले.काही महिलांनी सांगितले की, फेब्रुवारीपर्यंत महिला विशेष लोकल कल्याण येथूनच सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी सुटत होती. डोंबिवलीला ती सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी यायची. एरव्ही, ठाकुर्ली व डोंबिवली स्थानकांत ती पूर्ण भरत असे. त्यामुळे ही लोकल पूर्वीच्याच वेळी सोडावी, जेणेकरून त्या सवयीनुसार प्रवास करणे सोपे जाईल. तर, काही महिला म्हणाल्या की, सकाळी ९ वाजता स्थानकांमध्ये महिलांची गर्दी वाढते, त्यामुळे तेव्हा ही लोकल सोडावी. ही लोकल गुरुवारी रिकामी धावल्याने फिजिकल डिस्टन्सिंग राखले गेले. जेवढी आसनव्यवस्था आहे, तेवढेच प्रवासी डब्यात असल्यास कोरोनाला प्रतिबंध घालणे सोपे जाणार आहे, असे काहीनी सांगितले.बदलापूरहून आणखी एक लोकल हवीआगामी काळात महिला विशेष लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. एक लोकल कल्याणहून सकाळी पूर्वीच्या वेळेत तर, दुसरी लोकल सकाळी ९ च्या सुमारास बदलापूरहून सोडावी, अशी मागणी प्रवासी संघटना करणार आहेत.

टॅग्स :localलोकलWomenमहिला