शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

शिवसेनेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे

By admin | Updated: July 6, 2017 06:41 IST

पनवेल शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अक्षम्य खेळखंडोबा सुरू आहे. सतत वीजप्रवाह खंडित होत असतो. त्यामुळे शिवसेनेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अक्षम्य खेळखंडोबा सुरू आहे. सतत वीजप्रवाह खंडित होत असतो. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली पनवेलच्या महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कार्यालय निरुपयोगी असल्याने टाळे ठोकले. पायोनियर विभाग, टपाल नाका, कोळीवाडा, बावन बंगला, कच्छी मोहोल्ला, बंदर रोड या भागात दिवसभरातून अनेकदा अनेक तास वीज नसतेच. पनवेल आता महानगरपालिका झाली आहे. एअरपोर्टसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोजेक्ट्स येथे येत आहेत. अशा परिस्थितीत अखंडित वीज मिळणे ही पनवेलकर जनतेची मूलभूत अपेक्षा आहे. वीजवाहिन्या भूमिगत करणेकामी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी पालिकेकडेही सेनेने पाठपुरावा दोन महिन्यांपूर्वीच सुरु केला आहे. तेव्हा आता निर्वाणीची वेळ आली असून जर आपण आवश्यक त्या सुधारणा योग्य वेळी केल्या नाहीत तर जनतेचा संयम राहणार नाही. तेव्हा जर आपणाला काही काम करायचे असेल तर ताबडतोब ही समस्या निकाली काढा नाहीतर टाळे लावून आपले पनवेल महावितरणचे कार्यालय बंद तरी करून टाका, अन्यथा शिवसेनेला ते करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रथमेश सोमण यांनी या वेळी दिला. या वेळेस पनवेल शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून विजेचा खेळखंडोबा थांबवा, शहरातील वीजवाहिन्या लवकरात लवकर भूमिगत करा, कार्यालयातील दूरध्वनी चालू अवस्थेत ठेवून त्यावर कायम एक अटेंडंट ठेवा, पनवेलमध्ये विभागानुसार अधिकाऱ्यांना तक्रारींसाठी मोबाइल देऊ करून त्यांचे नंबर सार्वजनिक जाहीर करा , नागरिकांना तुम्ही पाठवत असलेली अव्वाच्या सव्वा बिले तपासून योग्य ती बिलेच द्या, शहरात आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवावा, जुने पोल, खराब फ्युज रिप्लेस करा, उघड्या डीपीजवर झाकणे बसावा इत्यादी या मागण्यांच्या निवेदनासह कुलूपही भेट दिले. या वेळेस जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, महिला उपजिल्हा संघटक सीमा मानकामे, शहर संघटक अच्युत मनोरे, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, प्रवीण जाधव, अनिल कुरघोडे, विभागप्रमुख यतीन मानकामे, भरत कल्याणकर, रवींद्र पडवळ, सुजन मुसलोडकर, उपविभागप्रमुख राजेंद्र भगत, मंदार काणे, शाखाप्रमुख अर्जुन परदेशी, प्रसाद सोनावणे, राजेश बतले, दत्तात्रय फडके, युवासेनेचे अक्षय नरसाळे, तबरेज मास्टर कामगार संघटनेचे अनित गागडा, प्रदीप इंदवटकर व इतर पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.