शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार

By admin | Updated: November 12, 2016 06:34 IST

अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना अशी शेकाप विरोधी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न

अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना अशी शेकाप विरोधी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू होते; परंतु या आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच बिघाडी झाल्याने अखेर एक थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि ५ नगरसेवक उमेदवार अशा सहा उमेदवारांच्या माध्यमातून शिवसेना अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी अलिबाग तालुकाप्रमुख दीपक रानवडे, अलिबाग शहरप्रमुख कमलेश खरवले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. सुशील पाटील व पाच नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.आघाडीच्या गणिताप्रमाणे पाच नगरसेवक उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले होते; परंतु गुरुवारी संध्याकाळपर्यंत आघाडीतील एक प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेसने आघाडीबाबतचा अंतिम निर्णय घेतला नाही. परिणामी, अखेर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडीच्या चर्चेतील गणितानुसार आम्ही नगराध्यक्ष आणि पाच नगरसेवक असे सहाच अर्ज दाखल करू शकलो. दरम्यान, आघाडी झाली असती तरी आम्ही धनुष्यबाण या आमच्या पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार होतो. परिणामी, सेनेचे अस्तित्व स्वतंत्रच राहणार होते तसे आताही आम्ही ते ठेवले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी आणि नगरसेवकपदाचे उमेदवार म्हणून पंकज झाडेकर (प्रभाग-१/ब-सर्वसाधारण), सागर बडमे (प्रभाग-३/अ,ना.मा.प्र.सर्वसाधारण), श्वेता पालकर (प्रभाग-४/ब, सर्वसाधारण महिला), राखी खरवले (प्रभाग-७/ब, सर्वसाधारण) असे एकूण सहा जण निवडणूक रिंगणात असल्याची माहिती अ‍ॅड. सुशील पाटील यांनी दिली. विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही मतदारांकडे जाणार आहोत.