शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त नवी मुंबईच्या आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 03:13 IST

दुष्काळाने आमच्यावर उपासमारीची वेळ आली बाबा... आमच्या मुलांच्या शिक्षणाचं बी दिवाळं निघालं... समदी शेती कोरडी पडली...विहिरी, नद्या कोरड्या ठाक झाल्या...

वैभव गायकर,पनवेलगावात पिण्यासाठी पाणी नाही...मून आम्ही इतं या शहरात आलो...दोन वेळ पोट भरलं तरी खूप हाय... जागा मिळतं तेथं रात्र काढतो..रोजंदारी करून मिळतं ते काम करत आम्ही दिवस पुढे ढकलत हाव... ही व्यथा मांडली आहे बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यात असलेल्या मैदा गावातून स्थलांतरित झालेल्या सचिन दहिफळे यांनी.राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे. रोजगार व कामधंद्यांच्या शोधात दुष्काळग्रस्त नवी मुंबई स्थलांतरित झाले असून मिळेत ते काम करताना दिसून येत आहेत. काही दुष्काळग्रस्त नवी मुंबईतील आपल्या नातेवाइकांकडे राहत आहेत तर काही जण रेल्वे स्थानक, बस डेपोमध्ये वास्तव्य करत आहेत.एकट्या बीड जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त गावातील रहिवासी नवी मुंबईत स्थलांतरित झाले आहेत. एकट्या नवी मुंबईत चार ते पाच हजार दुष्काळग्रस्त आले आहेत.गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ आणि वाढत्या समस्या पाहता दुष्काळग्रस्तांनी थेट नवी मुंबईत स्थलांतर केले आहे. वाशी, नेरूळ, खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेलसारख्या शहरात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. जवळपास ५० कुटुंबे याठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या अशी मागणी ते करीत आहेत. सध्या रसवंतीच्या गाड्या चालवून काही जण आपला उदरनिर्वाह करीत आहेत, तर काही जण रोजंदारीची मजुरी काम करून पोटाची खळगी भरत आहेत. महिलांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला असून पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून त्या मेहनत करताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातून रांजणी या गावात शेतमजुरी करणारे विठ्ठल पाटोळे हे देखील मागील तीन महिन्यांपासून जुई कामोठे याठिकाणी राहत आहेत. दुष्काळामुळे रोजंदारी नसल्याने या ठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितलं. सोबत दोन मुली, पत्नी असे त्यांचे कुटुंब आहे. जुई गावात भाड्याच्या खोलीत राहून सध्या उसाची रसवंती चालवत आहेत. लाकडी चरख्याद्वारे उसाचा रस काढून दिवसाला ३०० ते ४०० रुपये रोजगार मिळवत आहेत. दुष्काळाचे सावट दूर झाले की आम्ही याठिकाणाहून पुन्हा आमच्या गावी जावू, मात्र गावची परिस्थिती हलाखीची असल्याने आम्ही नाईलाजास्तव याठिकाणी राहत आहोत, असेही ते म्हणाले.