शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातबाऱ्यातून परस्पर शेतकऱ्यांची नावे गायब

By admin | Updated: August 8, 2016 02:48 IST

वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. १९५७ च्या जागी १९५२ असा उल्लेख करून कुळांची नावे सातबारा उताऱ्यावरून कमी केली आहेत

नामदेव मोरे, नवी मुंबईवाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. १९५७ च्या जागी १९५२ असा उल्लेख करून कुळांची नावे सातबारा उताऱ्यावरून कमी केली आहेत. सिडकोने या परिसरातील जमीन फेब्रुवारी १९९९ मध्ये भूसंपादनातून वगळली व सहा महिन्यात पुन्हा संपादित केली असल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितल्यामुळे वाघिवली गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघर्ष करून कूळ कायदा बनविण्यास सरकारला भाग पाडले, त्याच जिल्ह्याचा भाग असलेल्या वाघिवली गावातील ६६ कुळांना भूमिहीन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे १९५७ मध्ये कुळांची वहिवाट निराळी असल्याने कुळांचा हिस्सा वेगळा केला असल्याचा उल्लेख आहे. परंतु नंतर १९५७ च्या ठिकाणी खाडाखोड करून १९५२ असा उल्लेख केला आहे. यानंतर शेतकरी जमीन कसत नसल्याचे कारण देवून त्यांचे कूळ म्हणून नाव वगळण्यात आले आहे. यानंतर शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ९५ गावांमधील सर्व जमीन संपादित केली. यामध्ये वाघिवलीमधील १५२ एकर जमीनही घेतली होती. ७ डिसेंबर ७० मध्ये सातबारा उताऱ्यावर त्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर जवळपास २९ वर्षांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये ही जमीन संपादनातून वगळण्यात आली. भूसंपादनाचा शिक्का वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने जमीन संपादनातून वगळली व जुलैमध्ये ती मुंदडा यांच्या वारसदारांच्या नावावर केली. परंतु मार्चमध्ये पुन्हा ही जमीन संपादित करण्याची नोटीस काढण्यात आली. याविषयी संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबर २००० मध्ये पुन्हा संपादित केली आहे. संरक्षित कुळांची नावे वगळणे, जमिनीचे संपादन, पुन्हा भूसंपादन रद्द करून एक वर्षात पुन्हा जमीन ताब्यात घेण्याचा एकूण व्यवहार संशयास्पद असून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठीचा कट असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सिडकोने १९७० मध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली त्या सर्वांना अद्याप साडेबारा टक्के योजनेचे भूखंड वाटप केलेले नाहीत. जमीन उपलब्ध नाही, जमिनीवर अतिक्रमण असल्याचे सांगून शेतकऱ्यांना भूखंड वाटपात दिरंगाई केली जात आहे. परंतु वाघिवली प्रकरणामध्ये जमीन संपादित केल्यानंतर ९ वर्षांमध्येच साडेबारा टक्के योजनेचे भूखंड संबंधितांना देण्यात आले. विशेष म्हणजे इतर सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या गावाला लागून भूखंड दिले जात असताना रायगड जिल्ह्यातील या गावातील भूखंड ठाणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बेलापूरमध्ये भूखंड दिले आहेत. अशिक्षित व अल्पशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. १९७० मध्ये शासनाने नवी मुंबई प्रकल्पासाठी ही जमीन संपादित केली३ फेब्रुवारी १९९९ मध्ये शासनाने ही जमीन संपादनातून वगळलीमार्च २००० मध्ये पुन्हा जमीन संपादन करण्याची कार्यवाही सुरू नोव्हेंबर २००० मध्ये शासनाने पुन्हा जमीन संपादित केलीएप्रिल २००७ ते २00९ मध्ये साडेबारा टक्केचे भूखंड कुळांऐवजी त्यांच्या मालकांना मंजूरभूखंड मंजूर होताच त्रिपक्षीय करार करून तो विकासाला देण्यात आला वाघिवलीमधील शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केलीविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंंडकर यांनी लक्षवेधी मांडून चौकशीची मागणी केलीसिडकोने २०१४ मध्ये विकासकास कारणे दाखवा नोटीस काढली२०१५ मध्ये सिडकोने या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.