शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सात महागड्या कार जप्त

By admin | Updated: March 7, 2016 02:43 IST

कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतकडून पोलिसांनी सात महागड्या कार जप्त केल्या आहेत.

नवी मुंबई : कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतकडून पोलिसांनी सात महागड्या कार जप्त केल्या आहेत. त्याने सुमारे २१ गाड्यांच्या कर्जाचे हप्ते थकवून विविध बँकांची फसवणूक केलेली आहे.सुमारे ३५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी द्वारका मिल्कचा संचालक कपिल राजपूतचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. त्याच्यावर विविध बँकांमधून महागड्या कार खरेदीसाठी कर्ज घेवून विविध बँकांची फसवणूक केल्याचा देखील गुन्हा दाखल आहे. त्याने विविध बँकांमधून कार खरेदीसाठी कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाची परतफेड न करता बँकांची फसवणूक केली. त्याला वाशी पोलिसांनी अटक केल्याचे समजताच सदर बँकांनी देखील त्याच्याविरोधात तक्रार केल्या. यानुसार २४ कार खरेदीतून विविध बँकांची ९ कोटी ५० लाख रुपयांच्या फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने ६ महागड्या कार जप्त केल्या आहेत. या कार विविध ठिकाणावरुन त्या जप्त केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. फियाट लिनीया (एमएच ४३ एबी ४४६५), मर्सिडीज बेंज (एमएच ४६ एल १२००), फियाट लिनीया (एमएच ०६ एवाय १२१२), कोरोला अ‍ॅल्टिस (एमएच ४३ एएफ ७११०), शेवरलेट क्रुझ (एमएच ४३ एजे ४७५०), आॅडी (एमएच ४६ व्ही १२१३) व मर्सिडिज ( एमएच ४३ एजी ३७७७) अशा या सात कार आहेत. त्यापैकी आॅडी कार कपिल राजपूत याच्याकडून तर मर्सिडीज बेंज ही त्याचा भाऊ मिथिलेश हा वापरत होता. त्याच्या अटकेनंतर पनवेलच्या गार्डन हॉटेलबाहेर पोलिसांना सापडली आहे. एक लिनीया कार कोपरीतील गॅरेजमधून पोलिसांनी जप्त केली आहे. तर दुसरी (एमएच ०६ एवाय १२१२) लिनीया कार राष्ट्रवादीचे पनवेलचे माजी नगरसेवक सुनील मोहोड यांच्याकडून पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय अटकेत असलेला राजपूतचा सी.ए. दीपेश ठक्कर याच्याकडून कोरोला व क्रुझ या दोन कार जप्त झाल्या आहेत. तर मर्सिडिज (एमएच ४३ एजी ३७७७) ही संतोष तळपदे यांच्याकडून जप्त केली आहे.बँकांची फसवणूक करून राजपूतने घेतलेल्या कार संबंधितांकडे कशा आल्या? त्यांचाही या गुन्ह्यांमध्ये संबंध आहे का? याचा उलगडा गुन्हे शाखेकडून लवकरच होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोहोड यांनाही राजपूतकडून कार घेतल्याप्रकरणी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तर इतर गाड्यांच्या शोधात पोलिसांचे हात शहरातील इतरही अनेक प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)