शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

..तर डीजे होणार जप्त!

By admin | Updated: August 29, 2016 04:33 IST

सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत तेरा गावाच्या हद्दीतील गणपती बाप्पाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत तसेच उत्सवात डीजे लावण्यास मनाई आहे

पालघर : सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत तेरा गावाच्या हद्दीतील गणपती बाप्पाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत तसेच उत्सवात डीजे लावण्यास मनाई आहे. तिचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त केला जाईल, असा इशारा सहा.पो.नि.किशोर शिंदे यांनी दिला.गणपती उत्सवाला ५ सप्टेंबर पासून सुरु वात होत असून पोलीस स्टेशन अंतर्गत १४२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि ३७४ घरगुती मूर्तीची स्थापना करण्यात येते. हा उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करता यावा या साठी सातपाटीसागरीपोलीस स्टेशन अंतर्गत माहीम, वडराई, शिरगाव, सातपाटी, मुरबे,नांदगाव,नवापूर,उच्छेळी-दांडी,ई, तेरा गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची सभा काल सातपाटी च्या काशिनाथ भाई पागधरे सभागृहात पार पडली. या वेळी अत्यंत सुबद्ध पद्धतीने विसर्जन करणाऱ्या सीआरपी मंडळ,उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्र म साजरे करणारे बामणी पाडा मंडळ, उत्कृष्ट देखव्यासाठी नवापूर, तर एक गाव एक गणपती साठी आलेवाडी गावाला बक्षिसाचे वितरण करण्यात आले. गावागावांत दिसून येणारे खड्डे,कचऱ्याचे ढीग दूर करण्यासाठी संबंधीत ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचना करून विद्युत वितरणने विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे लेखी पत्र दिल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या डीजेवर यावेळी पूर्णत: बंदी असून त्याचा वापर झाल्यास डीजे जप्त केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या वर आळा घालण्याच्या दृष्टीन ड्राय डे असूनही परिमट रूम,बिअर शॉपी,घराघरातून चोरट्या पद्धतीने बिअर,व्हिस्की विकणाऱ्या वर कडक कारवाई साठी धाडी घालण्यात येणार आहेत. (वार्ताहर)