शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

भंगार चोरांचा धुमाकू ळ

By admin | Updated: March 5, 2016 02:00 IST

खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभागात भंगारचोरांनी धुमाकूळ घातला आहे. अंधाराचा फायदा घेत हे भंगारचोर चोरी करण्यासाठी रात्रभर या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

खोपोली : खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभागात भंगारचोरांनी धुमाकूळ घातला आहे. अंधाराचा फायदा घेत हे भंगारचोर चोरी करण्यासाठी रात्रभर या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या भंगारचोरांना स्थानिक भंगार व्यावसायिकांचे सहकार्य मिळत असल्याने या भागातील बंद कारखान्यांना लक्ष केले जात असून यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. बंद कारखान्यांमध्ये काही स्थानिकांची मदत घेत ट्रक लावून भंगार चोरण्याचे काम सुरू असल्याचेही पहायला मिळत आहे. खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभाग हा मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखला जातो. या विभागात २०० हून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. यामध्ये स्टील आणि प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या अधिक आहे. उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणावर या कारखान्यामध्ये भंगार जमा होत असतो. दिवसभर हे भंगार चोर रस्त्याच्या शेजारी फिरून कचऱ्यातील भंगार गोळा करीत असताना परिसरात कुठे भंगार चोरता येईल याची पाहणी करतात आणि संधी साधून रात्री कंपनीमध्ये घुसून भंगार लंपास केले जाते. भंगार चोरांकडून अनेकदा बंद कारखान्यांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. सुरू असलेल्या कारखान्यांमधून कमी जास्त प्रमाणात भंगार चोरीला जाते. परंतु पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा तक्र ार न करता याकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जाते. याचा फायदा मात्र या चोरांकडून घेतला जातो. अनेकदा चोरी केल्यानंतरही तक्र ार दाखल होत नसल्याने अंधाराचा फायदा घेत कोणत्याही कारखान्याच्या आवारात शिरण्याचे धाडस चोरांकडून केले जाते. या भंगार चोरांना स्थानिक भंगार व्यावसायिकांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झालाच तर आपल्याला सोडविण्यासाठी कोणीतरी आहे असा विश्वास असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या भंगार चोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)