शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

फांगणे गावात भरली आज्जींची शाळा

By admin | Updated: March 10, 2016 02:00 IST

वय झाले तरी शिक्षण घ्यावे वाटते, याचा एक अनोखा उपक्र म मुरबाड तालुक्यातील फांगणे राबविण्यात आला. ३५० लोकवस्तीच्या या गावामधे मंगळवारी उत्साहाचे वातावरण होते

धसई : वय झाले तरी शिक्षण घ्यावे वाटते, याचा एक अनोखा उपक्र म मुरबाड तालुक्यातील फांगणे राबविण्यात आला. ३५० लोकवस्तीच्या या गावामधे मंगळवारी उत्साहाचे वातावरण होते. रस्ते सुंदर रांगोळ्या काढून सजवले होते. गावातील महिला व पुरु षांनी प्राथमिक शाळेजवळ गर्दी केली होती. निमित्त होते आज्जीबाईच्या शाळेचे.या शाळेच्या उद्घाटनासाठी गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ढोल ताशा घेऊन उभे होते. सर्व आज्जीबाई हातात दप्तर घेऊन जमा झाल्यावर मिरवणुकीला सुरवात झाली. आज्जीबार्इंसोबत सुना, नातवंडे, प्रमुख पाहुणे व खास वृद्ध महिलांसाठी हा अनोखा उपक्र म राबविणारे उद्योजक दिलीप भाई दलाल त्यांच्या मातोश्री इंदुबाई दलाल, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार, मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत, शिक्षण प्रेमी किसन चौधरी त्यांच्या पाठीमागे ग्रामस्थ अशी ही मिरवणूक आज्जीबाईच्या शाळेपर्यंत वाजत गाजत आली. या शाळेचे उद्घाटन अंबरनाथच्या आज्जीबाई इंदुबाई मोतीराम दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे २७ आज्जीबाईनी या शाळेत प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश म्हणजे लुगडे कै.मोतीराम गणपत दलाल धर्मदायी न्यासा तर्फे इंदुबाई दलाल यांचे हस्ते वाटप करण्यात आले. त्याच बरोबर वही पेन अन् पुस्तकेही देण्यात आली. जागतिक महिला दिन निमित्त खास शाळा सुरु करावी, असा फांगणे प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक योगेंद्र बांगर व गावच्या ग्रामस्थांचा विचार यामुळे प्रत्यक्षात अंमलात आली.