शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

पनवेलमधील स्कॅनिंग मशीन बंद

By admin | Updated: October 4, 2016 02:46 IST

काही दिवसांपूर्वी उरणमध्ये अतिरेकी दिसल्याच्या संशयावरून परिसरात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. उरणसह पनवेल शहरासह येथील रेल्वे स्थानकातील सुरक्षा

पनवेल : काही दिवसांपूर्वी उरणमध्ये अतिरेकी दिसल्याच्या संशयावरून परिसरात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. उरणसह पनवेल शहरासह येथील रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. हार्बर मार्गावरील अंतिम स्थानक, कोकणात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा थांबा असल्याने स्थानकात दररोज लाखो हजारो प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी याठिकाणी स्कॅनिंग मशीन बसविण्यात आले आहे. मात्र महिन्याभरापासून मशीन बंद आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पनवेल रेल्वे स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. कोकणातील विस्तीर्ण किनारपट्टीवरून पनवेल मार्गे अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किनारपट्टीवर शस्त्र किंवा दारूगोळा उतरण्याची शक्यता गुप्तहेर संघटनांकडूनही अनेकदा वर्तवण्यात आली आहे. याचा अनुभव १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी आला आहे. या स्थानकात लोकल्सबरोबरच कोकण व दक्षिण भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबतात. येथून जवळच जेएनपीटी बंदर, ओएनजीसी प्रकल्पाबरोबरच अनेक रासायनिक प्रकल्प आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकात चोख बंदोबस्त, तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र महिन्याभरापासून स्थानकातील स्कॅनिंग मशीन बंद असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.