शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

संजय घरत पनवेल पालिकेचे आयुक्त?

By admin | Updated: September 30, 2016 04:14 IST

रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून जिचा गौरव होतो, ती पनवेल महापालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येते आहे. या महापालिकेच्या आयुक्तपदासाठी

कल्याण : रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून जिचा गौरव होतो, ती पनवेल महापालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येते आहे. या महापालिकेच्या आयुक्तपदासाठी कल्याण-डोंबिवलीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या नावाची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. तशी मागणी करणारा अर्ज त्यांनी राज्य सरकारकडे केल्याचा दावाही त्याच्या पुष्टीसाठी केला जात आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा त्यांना उपयोग होईल, असेही सांगितले जाते आहे. घरत रजेवर असल्याने त्यांची याबाबतची प्रतिक्रिया समजू शकली नाही.घरत हे अत्यंत हुशार अधिकारी आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ते उपायुक्त म्हणून रुजू झाले. डोंबिवली आणि कल्याण या दोन्ही शहरांत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम सुरू झाला, तेव्हा परिवहन व्यवस्थापक म्हणूनही ते काम पाहत होते. त्या पदावरून त्यांची बदली कधी डोंबिवलीचे उपायुक्त, तर कधी कल्याणचे उपायुक्त अशी झाली. त्यानंतर, ते सामान्य प्रशासन आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त होते. आधीचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याशी असलेला त्यांचा संघर्ष चर्चेत होता. सोनवणे यांच्यानंतर आयुक्तपदी आलेले ई. रवींद्रन यांच्याशीही नंतरच्या काळात त्यांचे संबंध ताणले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर घरत हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनीही शब्द टाकल्याचे कळते. घरत यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. त्याचा उपयोग पनवेलची घडी बसवण्यासाठी होऊ शकतो.