शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संदीप तटकरेंचा मार्ग एकला चलो रे...

By admin | Updated: November 7, 2016 03:00 IST

रोहा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. अवधूत तटकरे यांचे धाकटे बंधू संदीप तटकरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींबरोबर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून

रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. अवधूत तटकरे यांचे धाकटे बंधू संदीप तटकरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींबरोबर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यातच रोनप निवडणुकीतील सेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दीपक तेंडुलकर यांचा अर्ज छाननीत बाद झाला. यामुळे सेनेचे जिल्हाप्रमुख रवी मुंढे, तालुकाध्यक्ष संजय देशमुख यांच्यावर टीका होत होती. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा रायगडचे खा. अनंत गीते यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत संबंधितांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर युद्धपातळीवर चर्चा होवून सेना भवनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे असलेल्या संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित करण्यात आले. संदीप तटकरे यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला असला तरी तांत्रिक अडचणींमुळे शिवसेनेत संदीप तटकरे यांना एकला चलो रे या भूमिकेतून काम करावे लागणार आहे.सेनाभवन येथे अनंत गीते यांच्या हस्ते भगवी शाल व शिवबंधन बांधून संदीप तटकरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, आ. भरत गोगावले, जिल्हा प्रमुख रवी मुंढे, प्रकाश देसाई, बाळशेट लोखंडे, अनिल नवगणे, विलास गोळे, तालुकाध्यक्ष संजय देशमुख, नितीन तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप तटकरे यांचे वडील अनिल तटकरे व त्यांचे बंधू अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. तसेच संदीप तटकरे यांच्या मातोश्री शुभदा तटकरे या राष्ट्रवादीच्या जिल्हापरिषद सदस्या आहेत. यामुळे संदीप तटकरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचा कार्यक्र मासाठी संदीप तटकरे यांच्या व्यतिरिक्त घरातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मी कोणालाही आव्हान देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असे संदीप तटकरे यांनी सांगितले आहे.संदीप तटकरे यांनी अधिकृ तरीत्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप तटकरे असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तटकरे कुटुंबातील कौटुंबिक कलहाची चर्चा होत होती. अनेक कार्यक्र मामधून सुनील तटकरे व अवधूत तटकरे यांच्यातील विसंवाद समोर येत होता. मात्र याबाबत दोन्ही बाजूकडून कधीही वाच्चता झाली नव्हती. (वार्ताहर)सुनील तटकरेंपुढे मोठे आव्हानपक्षातील काही नाराजांनी नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहे. यामुळे अगोदरच विविध समस्यांच्या फे ऱ्यात अडकलेल्या सुनील तटकरे यांना त्यांचा पुतण्या संदीप तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नवे आव्हान समोर उभे राहिले आहे. संदीप तटकरे यांचे बंधू आ.अवधूत तटकरे यांनी दीर्घकाळ रोहा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे. अवधूत तटकरे यांना मानणारा तरूणवर्ग तसेच मुस्लीम समाजात देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तांत्रिक अडचणींमुळे अवधूत तटकरे व अनिल तटकरे हे निवडणूक प्रचारात उघडपणे सहभागी होवू शकत नसले तरी संदीप तटकरे यांना निवडून आणण्यात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असणार.