शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंची भाषणाची संधी वगळली

By admin | Updated: January 25, 2016 02:44 IST

रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र

संदीप जाधव ,  महाड/दासगाव रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र ठेकेदाराची चालली. यामुळे रायगड महोत्सवाच्या प्रारंभीपासूनच मान्यवरांना भाषणाची संधी न देणे, स्थानिकांना विश्वासात न घेणे, स्थानिक माध्यमांना बरोबर न घेणे असे प्रकार दिसून आले. उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री प्रकाश महेता, स्थानिक आमदार भरत गोगावले, शेकाप नेते जयंत पाटील यांना व्यासपीठावर बसवूनही त्यांना बोलण्याची संधी न देता आयोजकांनी त्यांचा अवमानच केला. तर ज्या गावात हा कार्यक्र म पार पडत होता त्या पाचाड गावच्या सरपंच ज्योती गायकवाड यांना व्यासपीठावरही बोलावण्यात आले नाही. हेच सत्र समारोपाच्या कार्यक्र मातही सुरू राहिले. समारोप सोहळ्याला आयोजकांनी कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना निमंत्रित केले होते. त्यांना व्यासपीठावर बोलावण्यातही आले, मात्र बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांची गाडी अडवली. तावडे यांना धारेवर धरून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. हीच स्थिती अन्य मान्यवरांच्या बाबतीतदेखील घडली. व्यासपीठावर बसलेल्या विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे यांनादेखील भाषणाची संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.