शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

वाशीतील भावे नाट्यगृहाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: October 17, 2015 23:50 IST

शहरातील विरंगुळ्याचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या वाशीतील भावे नाट्यगृहाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे त्या ठिकाणचे १६ पैकी अवघे तीन कॅमेरे सुरू आहेत.

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईशहरातील विरंगुळ्याचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या वाशीतील भावे नाट्यगृहाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे त्या ठिकाणचे १६ पैकी अवघे तीन कॅमेरे सुरू आहेत. बंद असलेले हे कॅमेरे दुरुस्त करण्यासंदर्भात भावे प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही विद्युत विभागाने त्यास गांभीर्याने घेतलेले नाही.वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृह हे शहरातील विरंगुळ्याचे मुख्य केंद्र आहे. राजकीय सभांसह शाळांचे कार्यक्रम तसेच विविध नाटकांचे प्रयोगदेखील त्या ठिकाणी होतात. यामुळे त्या ठिकाणी प्रतिदिन नागरिकांची मोठ्या संख्येने ये-जा सुरूच असते. सिडकोकालीन हे नाट्यगृह सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. यानुसार तिथली सर्वस्वी देखभाल महापालिकेतर्फे केली जाते. मात्र पालिकेच्या विद्युत विभागाकडून भावेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे वर्षभरापासून त्या ठिकाणचे १३ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून अवघे तीनच कॅमेरे सुरू आहेत. ही बाब गांभीर्याची असल्याने बंद स्थितीत असलेले कॅमेरे सुरू करण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी विद्युत विभागाकडे केलेली आहे. यानंतरही त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेला नाही.२००८ मध्ये याच भावे नाट्यगृहात दोन जिवंत बॉम्ब सापडले होते. सदर बॉम्बची माहिती वेळीच मिळाल्याने पोलिसांनी ते निकामी करून संभाव्य मोठी दुर्घटना टाळली होती. यानंतर भावेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय सन २००९ च्या स्थायी समितीमध्ये झाला होता. यानुसार भेट स्वरूपात दिलेले १६ सीसीटीव्ही भावेतल्या हालचालींवर नजर ठेवून होते. मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी त्यापैकी १३ कॅमेरे मागील वर्षभरापासून बंद आहेत. तर चालू स्थितीत असलेले तीन कॅमेरे साधे असल्याने त्याचे चित्रीकरणही तपासाकरिता उपयुक्त ठरत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असले तरी विद्युत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे.भेट स्वरूपात मिळालेल्या सीसीटीव्हींची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने सध्या ते बंद स्थितीत आहेत. शिवाय सुरू असलेले तीन कॅमेरेदेखील जुने असल्याने आवश्यक तितके उपयुक्त ठरत नाहीत. यामुळे भावे नाट्यगृहाच्या सुरक्षेत अद्ययावतता आणण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु मराठी नाटकांचा अथवा नाट्यरसिकांचा तिरस्कार असल्यानेच तिथल्या सुरक्षेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असल्याचाही आरोप प्रेक्षकवर्गाकडून होत आहे.यापूर्वी भावे नाट्यगृहात दहशतवादी कारवाईचा प्रयत्न झालेला असतानादेखील तिथल्या सुरक्षेत होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत पालिकेला पत्र पाठवल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या पत्रानंतरही पालिकेच्या विद्युत विभागाला याचे गांभीर्य कळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.सीसीटीव्हीची जबाबदारी कोणाची?नाट्यगृहातील सीसीटीव्ही तत्कालीन स्थायी समिती सभापतींच्या निर्णयानुसार विशेष निधीमधून बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सीसीटीव्हींची देखभाल व दुरुस्ती करायची कोणी, असा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेला आहे. हे कॅमेरे विद्युत विभागाने बसवलेले नसल्याने त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी आपली नसल्याचे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांनी सांगितले. यामुळेच नाट्यगृह प्रशासनाकडून पत्रावर पत्र पाठवूनदेखील त्याची दखल विद्युत विभागाने घेतलेली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अवघे तीन कॅमेरे सुरू : ऐरोली खाडीपूलमार्गे तीन संशयित व्यक्ती नवी मुंबईत आल्याची खबर एटीएसकडे प्राप्त असून, त्यांची रेखाचित्रे तयार करण्यात आलेली आहेत. त्याद्वारे संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू असतानाच त्यांच्याशी मिळत्याजुळत्या दोघांना भावेत पाहिल्याची तक्रार एका व्यक्तीने वाशी पोलिसांत केली. त्यामुळे पोलिसांनी भावे नाट्यगृहातले सीसीटीव्ही तपासले असता तिथले १६ पैकी अवघे तीन कॅमेरे सुरू असल्याची बाब उघड झाली.