शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी तपासणी करणाऱ्या कोरोनादूतांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 23:29 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : लागण होण्याची भीती

नवी मुंबई : राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही सुरुवात करण्यात आली आहे. घरोघरी तपासणी करण्यासाठी जाणारे कोरोनादूत थेट कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येत असून, त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, या कर्मचाऱ्यांना पीपीई किटसारखी सुरक्षा साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातूनही या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता ७२० पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात २ ते ३ कोरोनादूत घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व आॅक्सिजन सॅच्युरेशन मोजत आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या अ‍ॅपवर नोंदणी करून घेत आहेत. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर अशा मोहिमेच्या पहिला टप्प्यास सुरुवात झाली आहे. तपासणीदरम्यान अनेक संशयित रुग्ण आढळून येत असून, पुढील तपासणीसाठी कार्यवाही केली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून गेल्या काही आठवड्यांपासून नागरी आरोग्य केंद्रांमध्ये मास्कचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाºयांना मास्कचा तुटवडा भासत आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची साधने महापालिकेच्या माध्यमातून पुरविली जात नसल्याने, या करोनादूतांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.तपासणीसाठी ७२० जणांचे पथक तयार केले आहेत. त्यानुसार २ ते ३ कोरोनादूत घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या घेत आहेत. पण त्यांच्याकडं योग्य सुरक्षा साधने नसल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या