शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेबाबत ग्रामविकासाची कुरघोडी

By admin | Updated: September 13, 2016 02:40 IST

प्रस्तावित पनवेल महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहती आणि ३२ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कळंबोली : प्रस्तावित पनवेल महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहती आणि ३२ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला स्वतंत्र आदेश निर्गमीत केले आहे. महापालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांची ग्रामसभा घेवून त्यांचे मत घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.प्रस्तावित पनवेल महापालिकेला निवडणूक आयोगाकडून तांत्रिकदृष्टया विरोध होत होता. पनवेल नगरपालिकेच्या प्रभागरचनेला कोकण विभागीय आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिल्यामुळे महापालिका रेंगळणार असे चित्र निर्माण झाले होते. याबाबत भाजपचे स्थानिक नेते श्रीनंद पटवर्धन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महापालिकेच्या किती गरजेची आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आठ दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले. नगविकास विभागाने नैना क्षेत्रातील ३६ गावे वगळून पनवेल नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांना पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेश निर्गमीत केले. नगरविकास विभागाच्या पत्रानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन समाविष्ठ करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेण्याबाबत सुचीत केले. १ आॅक्टोबरपासून महापािलका होण्यासंदर्भात राज्यपालांनी आदेश दिले आहे. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली आहे. मात्र त्यानंतर ग्रामविकास विभागाने २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश पारीत केले आहेत. त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व पद रद्द होणार आहे. त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता त्याचबरोबर सदस्यत्व रद्द होत असल्याबद्ल अभिप्राय कळवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ठ करण्यात येणाऱ्या ३२ गावांच्या ग्रामपंचायतीच्या मासिक व ग्रामसभेचे ठराव त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव पाठविण्याचे सुचीत करण्यात आले आहे. सदर गावचे क्षेत्र समाविष्ठ न करण्याबाबत ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायत ठराव संमत करण्यात आल्यास त्याबाबत संबंधीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद स्थायी समितीचा संयुक्तिक समर्थन अभिप्राय देण्यास कळविण्यात आले आहे. याकरीता आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पुर्तता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र असे असताना ग्रामविकास विभागाने निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे ठराव मागितल्याने संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.