शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व बार व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर

By admin | Updated: May 22, 2017 02:25 IST

शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांकडून सर्व नियमांना केराची टोपली दाखवत, पहाटेपर्यंत हॉटेल्स चालवले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत अ

सूर्यकांत वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांकडून सर्व नियमांना केराची टोपली दाखवत, पहाटेपर्यंत हॉटेल्स चालवले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतानाही त्यावर कारवाईला उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांचीही डोळेझाक होत आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी कायद्यावर बोट ठेवणारे पोलीस प्रशासन नेमके हॉटेल व्यावसायिकांना सूट का देतेय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला असून तो फसलेला आहे. इच्छुकांना विदेशाप्रमाणे मुंबईत रात्रीचा आनंद लुटता यावा, ही त्यामागची संकल्पना होती; परंतु मुंबईत फसलेली नाइट लाइफ नवी मुंबईत सर्व नियम धाब्यावर बसवून यशस्वीरीत्या सुरू आहे. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांच्या मूक संमतीने सर्व नियम धाब्यावर बसवून हॉटेल्स व बार व्यावसायिकांकडून ही नाइट लाइफ चालवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हॉटेल व बार व्यावसायिकांना संबंधित खात्याकडून रात्रीची वेळ निश्चित करून दिलेली आहे. या वेळेतच हॉटेल्स व बार बंद होणे अपेक्षित आहे. वेळेच्या बंधनामध्ये साध्या हॉटेल्सकरिता रात्री ११ वाजेपर्यंत, आॅर्केस्ट्रा बारसाठी मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत, लेडीस सर्व्हिस बारसाठी रात्री ९.३० वाजेपर्यंत तर परमिट बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या वेळेनंतरही हॉटेल्स अथवा बार सुरू राहिल्यास संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, नवी मुंबईत तसे होत नसल्याचे उघड चित्र दिसते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर बसवले जात असल्याची तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वाशी हायवे, कोपरखैरणे, सानपाडा हायवे, नेरुळ, सीबीडी, कामोठे यांसह पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत हॉटेल्स व बार सुरू ठेवले जात आहेत. अशा सर्वच ठिकाणी पहाटेपर्यंत ग्राहकांना मद्यपानाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.