शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामोठ्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त !

By admin | Updated: March 31, 2016 02:38 IST

कामोठेतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर ‘लोकमत’ने ‘झकास कामोठे भकास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. याची दखल घेत सिडकोने बुधवारी खड्डे बुजविण्यासाठी निविदा

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली कामोठेतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर ‘लोकमत’ने ‘झकास कामोठे भकास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. याची दखल घेत सिडकोने बुधवारी खड्डे बुजविण्यासाठी निविदा प्रसिध्द केली आहे. याकरिता २ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने रस्त्याचा मधोमध छेद घेण्यात आला आहे. ते बुजण्याची तसदी खोदणाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कित्येक ठिकाणी केबल टाकण्याकरिता रस्ते उखडण्यात आले आहेत. मात्र उर्वरित डेब्रिज त्या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याने त्याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होत आहे. काही सेक्टरमध्ये चेंबरकरिता खोदकाम करण्यात आले. तिथे मातीच माती रस्त्यावर पसरली आहे. सेक्टर २० मध्ये इमारतीतील सांडपाणी वाहून नेण्याकरिता जोडणी करण्याचे काम सुरू आहे. याकरिता रस्त्याच्या मध्यभागी खड्डा करण्यात आलेला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सेक्टर-२१ येथे हावरे निर्मितीसमोर पाइपलाइन टाकण्याकरिता मोठे खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनांना येण्या- जाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. कामोठे वसाहतीत खाजगी मोबाइल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत. फोरजी, थ्रीजी, जल आणि मलनि:सारण वाहिन्या टाकताना अनेक ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था झाली असून ही वस्तुस्थिती सिडको अधिकाऱ्यांनी सुध्दा मान्य केली आहे. दरम्यान, सिडकोने वसाहतीतील विविध सेक्टरमधील खड्ड्यांचा भरणा तसेच रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी यावेळी दिली. कामोठे वसाहतीतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. सिडकोने आतापर्यंत रस्त्याचे इतके मोठे काम काढले नव्हते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत सिडकोने रस्त्यांकरिता निविदा प्रसिध्द केली ही बाब महत्त्वाची आहे. - गोरक्ष आहेर, उपशहर प्रमुख, शिवसेना, कामोठेपावलापावलावर रस्ते खोदण्यात आले आहेत. याकरिता सिडकोकडून कोणावर नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. मात्र सिडको रस्ते खड्डेमुक्त करणार आहे. या कामाचे क्रे डिट ‘झकास कामोठे भकास’ या ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेला जाते. - विपुल डुंबरे, रहिवासी कामोठेघर तसे अंगण आणि शहर तसे रस्ते यावरून सगळे मूल्यमापन होते. कामोठे वसाहतीत रस्त्यांची वाईट स्थिती आहे याला कारणीभूत सुध्दा सिडकोच आहे. मात्र ‘लोकमत’ने कामोठे वसाहतीतील रस्त्यांची समस्या मांडली आणि सिडकोला मोठा दणका दिला, त्याबद्दल ‘लोकमत’चे आभार.- स्वप्नाली म्हात्रे, रहिवासी