शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या नकाशातूनही गाढी नदी गायब !

By admin | Updated: February 14, 2016 03:10 IST

वर्षानुवर्ष पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या गाढी नदीचे अस्तित्व अतिक्रमण व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्याच्या हालचाली

- नामदेव मोरे,  नवी मुंबईवर्षानुवर्ष पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या गाढी नदीचे अस्तित्व अतिक्रमण व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्याच्या हालचाली सुरू असताना जिल्ह्याच्या नकाशामध्येही गाढी नदीचा समावेश नाही. नदीचे अस्तित्वच नाकारले असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.मुंबई, नवी मुंबई व रायगड परिसरातील विकासकामांसाठी येथील पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास सुरू आहे. सिडकोची स्थापना झाल्यानंतर ठाणे-बेलापूर एमआयडीसीमधील व उरण तालुक्यातील डोेंगर पोखरण्यास सुरुवात केली. येथील डोंगराचे अस्तित्वच नष्ट होत आले आहे. यानंतर मँग्रोज व मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली. ‘लोकमत’ने गाढी नदीच्या काठावर झालेली अतिक्रमणे व नदीपात्रातील प्रदूषणाविषयी वृत्त प्रसिद्ध करताच पर्यावरणप्रेमींनी नदीचे अस्तित्व टिकले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली आहे. अनेकांनी फोन करून गाढी नदीमधील अतिक्रमण व प्रदूषणापेक्षा शासनाने तिचे अस्तित्वच नाकारल्याची माहिती देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ, रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ व राज्य शासनाच्या जिल्हानिहाय नद्यांच्या नकाशावर गाढी नदीला स्थानच देण्यात आलेले नाही. गाढी नदी हाच पनवेलकरांचा मुख्य जलस्रोत असल्याचा उल्लेख ४४६ वर्षांपूर्वीच्या दस्तऐवजामध्ये सापडला. शासनाला नदीचा विसर पडल्याने नकाशावरून गाढी गायब केल्यामुळे यापाठीमागे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१० नद्यांचाच उल्लेख रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर व राज्य शासनाच्या जिल्ह्याच्या सविस्तर नकाशावर फक्त १० नद्यांचाच उल्लेख आहे. यामध्ये उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री, घोड व गंधार यांचा समावेश आहे. पनवेलमधील गाढी, मोरबे धरण ज्या नदीवर बांधले त्या मुर्बी नदीचा उल्लेखच नाही. पनवेल हे भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख केंद्र असणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक प्रकल्प येथे उभे राहात आहेत. गाडी नदी ही या शहराचा श्वास आहे. तिचे अस्तित्व नष्ट झाल्यास भविष्यात मिठीप्रमाणे या परिसरात पूर येऊन प्रचंड जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व पनवेलकरांसह पर्यावरणप्रेमींनी गाडी बचाव अभियान राबविण्याची गरज आहे. - सुकुमार किल्लेदार, अध्यक्ष, सेव्ह मँग्रोज अँड नवी मुंबई एक्झिस्टन्स