शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या कार पार्किंगमध्ये रेस्टॉरंट !

By admin | Updated: June 2, 2017 05:43 IST

पर्यटकांनी गजबजलेले पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. या माथेरानमध्ये पर्यटक आपल्या खासगी वाहनातून आले असता दस्तुरी

अजय कदम/ लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : पर्यटकांनी गजबजलेले पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. या माथेरानमध्ये पर्यटक आपल्या खासगी वाहनातून आले असता दस्तुरी येथील जागेत वन व्यवस्थापन समितीचे कार पार्किंग आहे. हे पार्किंग फुल्ल झाले असे सांगून कर्मचारी आपले हात वर करत आहेत. वास्तविक पाहता या पार्किंगमध्ये बेकायदा रेस्टॉरंट सुरू आहे, त्यामुळे येथे पर्यटकांचे हाल होत आहेत.माथेरान हे मुंबई, पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पर्यटक पहिली पसंती देतात. आपले खासगी वाहन घेऊन पर्यटक माथेरानला आले असता प्रवेशद्वारातच वन व्यवस्थापन समितीचे कार पार्किंग आहे. येथे पर्यटकांकडून पार्किंगचे कर आकारले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील पार्किंगमध्ये रेस्टॉरंट चालविले जात आहे. हे रेस्टॉरंट बस स्टॅण्डच्या बाजूलाच लावले जाते. त्यामुळे पार्किंगसाठी कमी जागा पडत असून येथे पर्यटकास वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी पार्किंग फुल्ल असे सांगून हात झटकत आहेत, नाइलाजास्तव पर्यटकांना परत जावे लागत आहे.तसेच येथील मूळवासीय संघटनेच्या घोडेवाल्यांनी याच कार पार्किंगमध्ये घोडे उभे केल्याने या संघटनेचे घोडे, माल वाहतुकीचे घोडे यांच्यामुळे आलेल्या पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वन व्यवस्थापन समिती व वन विभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प असा प्रकार सध्या पाहावयास मिळत आहे. घोडा स्टॅण्डची जागा व येथे असलेले रेस्टॉरंट या जागा जर खाली करून घेतल्या तर येथे पर्यटकांची ५० ते ६० वाहने पार्किंगमध्ये लागू शकतात. परंतु यावर कारवाई करण्यास वन विभागाचे व वन व्यवस्थापन समितीचे अधिकारी उदासीन दिसत आहेत.हे बेकायदा असलेले रेस्टॉरंट व घोडा स्टँड यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करणार असून, लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करणार आहोत.- गिरीश पवार, वन व्यवस्थापन समिती, अध्यक्ष