शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ

By admin | Updated: February 19, 2017 03:49 IST

माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यावर १७ फेब्रुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेकापचे सरचिटणीस प्रितम म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पनवेल : माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यावर १७ फेब्रुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेकापचे सरचिटणीस प्रितम म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नितीन पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पनवेल पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे. या प्रकाराबद्दल आमदार प्रशांत ठाकू र यांनी १८ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जर का आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्हीही या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितले. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकाही कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने शेकाप-भाजपामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर झालेल्या या वादामुळे हा प्रकार घडला. या घटनेसंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शेकाप शहर चिटणीस माजी नगरसेवक प्रितम म्हात्रे, सचिन म्हात्रे, अरुण म्हात्रे, विजय म्हात्रे व इतर मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मारेक ऱ्यांनी मला मारण्यासाठी हातात कोयते, हॉकी स्ट्रिक आणली होती,असे नितीन पाटील यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. भिवंडी सारख्या घटनेची पुनरावृत्ती पनवेलमध्ये होऊ नये म्हणून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा या घटनेचे जशास तसे उत्तर आम्ही देऊ, असा इशाराच त्यांनी दिला आहे. या वेळी पत्रकार परिषदेत भाजपा शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा नेते परेश ठाकू र, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, सी. भगत, नीलेश पाटील, विश्वास पाटील, प्रदीप सावंत आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)