शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रोडपाली परिसराला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:17 IST

नागरिकांची नाराजी : रस्त्यांसह पदपथांची झाली दुरवस्था

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक सातमधील अवस्था अतिशय बिकट आहे. येथे पायाभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. गटारे उघडी आहेत तर चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिले नाहीत आणि पथदिवे बंद अवस्थेत असतात. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. वारंवार तक्र ारी करूनही सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक सातमध्ये रोडपालीचा परिसर येतो. उंच इमारती आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांची घरे या प्रभागात आहेत. कळंबोलीच्या एका टोकाला असलेल्या या प्रभागाकडे सिडकोचे दुर्लक्ष होत आहे. सेक्टर १४, १५ आणि १६ या ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर डांबर राहिलेले नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मातीचे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळी नाले कचरा, डेब्रिज आणि मातीने फुल्ल झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हे नाले तुंबून पाणी रस्त्यावर येते. या कारणाने प्रभाग ७ मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. गटारावरील झाकले निघाली आहेत. तसेच त्या ठिकाणचे स्लॅब तुटलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालता येत नाही. या ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी आणि पहाटे रस्त्यावर अंधार दाटलेला असतो. त्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते. रहिवाशांना खेळण्यासाठी या प्रभागांमध्ये क्र ीडांगणाचा अभाव आहे. पोलीस मुख्यालयाच्या जवळ एका उद्यानाचे काम सुरू आहे. परंतु ते कधी पूर्ण होईल याबाबत प्रश्न विचारला जात आहे. या उद्यानामध्ये चिल्ड्रन पार्क आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची सोय नाही. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता मिलिंद म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.प्रभाग क्र मांक सातमध्ये दिसायला टोलेजंग इमारती आहेत. परंतु मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. यासाठी आम्ही सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच पत्रव्यवहारसुद्धा सुरू असतात. सिडकोने काही कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये रोडपालीकरता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवक म्हणून पाठपुरावा करीत आहोत.- राजेंद्र शर्मा, नगरसेवक, पनवेल महानगरपालिकाजड वाहनांची पार्किंग डोकेदुखीच्या प्रभागात बेकायदेशीर अवजड वाहनांची पार्किंग ही सर्वात मोठी समस्या आहे. कळंबोली वाहतूक शाखेने एका वर्षामध्ये १७ हजार वाहनांवर कायदेशीर कारवाई केली.च्त्यांच्याकडून लाखो रु पयांचा दंड वसूल केला. मात्र तरीही रस्त्यावर आणि मोकळ्या भूखंडांवर बेकायदा पार्किंग केली जात आहे. याकरता पदपथ आणि गटारे काही ठिकाणी बुजवून टाकण्यात आली आहेत.मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईप्रभाग क्र मांक सातमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. एका टोकाला आणि हा परिसर उंचावर असल्याने सर्वात शेवटी रोडपालीला पाणी मिळते. तेही कमी दाबाने. त्यामुळे उंच इमारतींमध्ये पाणी वर पोहोचत नाही. या कारणाने वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. ऐन पावसाळ्यातही येथील सोसायट्यांना पाणी मिळत नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई