शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’तील विकास शुल्कात कपात

By admin | Updated: August 31, 2016 03:36 IST

नैना क्षेत्रात बांधकामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या विकास शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबई नैना क्षेत्रात बांधकामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या विकास शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. हे दर त्या त्या विभागातील रेडिरेकरनच्या दरानुसार असणार आहेत. विकासकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मरगळलेल्या विकास कामांना गती मिळण्याची शक्यता बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. नैना योजनेत सहभागी होणाऱ्या भूधारकांसाठी सिडकोने दोन टप्पे तयार केले आहेत. यातील पहिला टप्पा १0 हजार हेक्टरचा असून त्यातील ६0 टक्के जमिनीवर भूधारकारकाला विकास करता येणार आहे. तर उर्वरित ४0 टक्के जमीन सिडको विनामोबदला घेणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ७.५ ते १0 हेक्टर जमिनीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. यातील जमिनीची विभागणी फिफ्टी-फिफ्टी करण्यात आली आहे. या दोन्ही टप्प्यातील भूधारकांना अनुक्रमे १.७ आणि २ इतके चटई निर्देशांक दिला जाणार आहे. नैना योजनेत सहभागी न होणाऱ्या भूधारकांना आपल्या भूखंडांच्या विकासासाठी प्रति चौरस मीटर २३00 रूपये इतके विकास शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क या परिसरातील जमिनीच्या किमतीपेक्षा अधिक असल्याची ओरड बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. तसेच त्यामुळे बजेटमधील घरांना खीळ बसेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने नगरविकास विभागातील छाननी समितीच्या शिफारसीवरून सिडकोने विकास शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रति चौरस मीटर २३00 रूपये इतके विकास शुल्क प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यात सुधारणा करून ते या रकमेच्या ३0 टक्के इतके करण्यात आले आहे. हे शुल्क अकृषिक जमिनीसाठी त्या त्या क्षेत्रातील प्रचलित रेडिरेकनरच्या दरानुसार असणार आहे. म्हणजेच्या सध्याच्या रेडिरेकनर दरानुसार विकास शुल्काची ही रक्कम प्रति चौरस मीटर ९00 ते १८00 रूपये प्रति चौरस मीटर इतकी असेल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत सिडकोने नव्या सुधारणांसह सुधारित आराखडा नगर विभागाच्या छाननी समितीला सादर केला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील टीडीआरसंदर्भातही महत्त्वपूर्ण बदल केल्याचे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील टीडीआरसंदर्भातही महत्त्वपूर्ण बदल केल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, साधारण पुढील पंधरा दिवसांत नैनाच्या या प्रारूप विकास आराखड्याला नगरविकास विभागाची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे.