शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

पुनर्विकासाला ‘ग्रहण’

By admin | Updated: August 28, 2015 00:03 IST

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेकडे जवळपास १५ प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्यामधून ६० कोटींपेक्षा जास्त महसूल

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेकडे जवळपास १५ प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्यामधून ६० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे. पुनर्विकासावरून राजकीय वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकासकामांमध्ये ३३ टक्के वाटा काही जण मागत असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. सिडकोने सीवूड, नेरूळ, वाशी व इतर ठिकाणी बांधलेल्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये कांदा - बटाटा मार्केटसह शहरातील ९२ वास्तू धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. अजून शेकडो इमारती धोकादायक घोषित करण्याची मागणी केली जात आहे. सरकारने या इमारतींच्या पुनर्विकासासाठी अडीच एफएसआय देण्याची घोषणा केल्यामुळे भविष्यात शहरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीमध्ये ८ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. अजून ७ प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या १५ प्रस्तावांना परवानगी देण्यासाठीची छाननी सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये संबंधितांना बांधकाम परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. यामधून महापालिकेस तब्बल ६० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार असून इमारतींचे बांधकाम झाल्यानंतर मालमत्ताकरही वाढणार आहे. महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी पुनर्विकासामधून महापालिकेस ६ हजार कोटी रुपये मिळतील असे वक्तव्य केले. विकास शुल्कासह, मालमत्ता कराचा यामध्ये समावेश असणार असल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महासभेमध्ये पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर केले असल्याचे किशोर पाटकर यांनी सांगितले. जर बांधकाम व्यावसायिकांना त्रास दिला नाही तर महापालिकेलाही चांगला लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे भाषण सुरू असताना काही नगरसेवकांनी बांधकाम व्यावसायिकांना त्रास होत असून ३३ टक्के वाटा मागितला जात असल्याची माहिती दिली. पुनर्विकास करताना ३३ टक्के कोण घेणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार असल्याचेही बोलले जात आहे. खाजगीत अनेक जण पुनर्विकासाचे फायदे व त्यामध्ये कोण कसे अडथळे आणत असल्याचे सांगू लागले आहे. राजकीय पदाधिकारीच अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिक तर काही ठिकाणी मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. पुनर्विकासाच्या श्रेयासह अर्थकारणावरूनही वाद होण्याची शक्यता आहे. एकमेकांवर कुरघोडी व प्रकल्पांचे काम मिळविण्यासाठीही चुरस होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न सामंजस्याने सुटणार की त्याचे राजकारण होत राहणार, यावर पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मनपाच्या उत्पन्नात वाढशहरात नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी फारसे भूखंड शिल्लक राहिलेले नाहीत. यामुळे मागील काही वर्षांत नवीन प्रकल्प हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच सुरू होत आहेत. परंतु पुनर्विकासामुळे मोडकळीस आलेल्या रहिवाशांना चांगले घर मिळणार असून महापालिकेलाही प्रत्येक प्रकल्पातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. परंतु हा विकास करताना राजकारण केले जावू नये असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. खाजगी इमारतींनाही एफएसआय?शहरातील सिडकोने बांधलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाने अडीच एफएसआय जाहीर केला आहे. परंतु खाजगी इमारतींसाठी हा निर्णय लागू नाही. लवकरच खाजगी इमारतींच्या पुनर्विकासाचा अध्यादेश निघणार असल्याची चर्चा बांधकाम व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हा निर्णय झाल्यास भविष्यात पुनर्विकासाचे काम मोठ्याप्रमाणात होवू शकते. रहिवाशांवरही येतोय दबाव पुनर्विकासाचे काम मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. पुनर्विकासासाठी रहिवाशांना वाढीव जागा देण्याचे आमिष दाखविले जात आहे. काही ठिकाणी नक्की किती जागा देणार हे स्पष्ट केले जात नाही. वाशीतील २५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या एक गृहनिर्माण सोसायटीमध्ये नागरिकांना पुनर्विकास केल्यानंतर किती चौरस फुटांचे घर देणार हे सांगितले जात नाही. दबाव टाकला जात असून याविरोधात रहिवाशांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.