शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नौदलाचा सेफ्टी झोन रद्द करण्यासाठी महाआघाडीच्या खासदारांना पुन्हा साकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:08 IST

उरण-करंजा येथे नौदलाचे शस्त्रागार आहे. या सुरक्षिततेसाठी सेफ्टी झोनचे आरक्षण आहे. आरक्षण असले तरी आरक्षणाच्या आधीपासूनच. या पूर्वीची आणि नंतरची सुमारे पाच हजारांहून अधिक घरे येेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क उरण : उरण-करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांनी दोनवेळा तर खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांनीही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतरही केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे घर व जमीन बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत पुन्हा खासदारांची भेट घेतली आहे. 

उरण-करंजा येथे नौदलाचे शस्त्रागार आहे. या सुरक्षिततेसाठी सेफ्टी झोनचे आरक्षण आहे. आरक्षण असले तरी आरक्षणाच्या आधीपासूनच. या पूर्वीची आणि नंतरची सुमारे पाच हजारांहून अधिक घरे येेत आहेत. परिसरात ४५ हजारांहून अधिक रहिवाशी राहतात. मात्र, आरक्षण असल्याने मालकीच्या जमिनी असूनही घरे बांधता येत नाहीत. २८ वर्षे उलटून गेल्यानंतरही सेफ्टी झोनबाबत नौदलाने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. तसेच केंद्र सरकारने जेएनपीटी बंदर विस्थापित हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसनही सेफ्टी झोनच्या जमिनीवर केले आहे. या तांत्रिक बाबींचा आधार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ऑगस्ट २०१९ रोजी राज्याचे नगरविकास विभागाचे माजी सचिव डॉ. नितीन करीर यांनी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या सेक्रेटरींनाच लेखी पत्र लिहून सेफ्टी झोनचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. 

१५ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा नव्याने राज्य सरकारच्या वतीने नगरविकास विभागाचे सचिव भूषण गगराणी यांनी उरणमधील सेफ्टी झोनचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला स्मरणपत्र पाठविले आहे. मात्र, त्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा दिल्लीत महाविकास आघाडीच्या खासदारांची भेट घेऊन याबाबत संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली असल्याची माहिती घर व जमीन बचाव समितीचे अध्यक्ष महेश म्हात्रे, सचिव संतोष पवार यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMember of parliamentखासदार