शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांचे संगणकीकरण रखडले

By admin | Updated: March 10, 2016 02:24 IST

रेशन कार्डमध्ये कोणाताही फेरफार किंवा बोगसगिरीला आळा बसावा, याकरिता डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. आगामी काळात सगळ्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे

प्रशांत शेडगे,  पनवेलरेशन कार्डमध्ये कोणाताही फेरफार किंवा बोगसगिरीला आळा बसावा, याकरिता डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. आगामी काळात सगळ्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राज्यात शिधापत्रिका संगणकीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील माहिती जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता आधार कार्डशी लिंकिंग होणे आवश्यक असून, त्याशिवाय नावाची नोंद होणार नाही. अर्ज त्याचबरोबर आधार कार्डची प्रत देण्याकरिता पनवेलकर पाठ फिरवत आहेत. आजतागायत ५० टक्के कार्डधारकांनी लिंकिंग केले नाही. त्यामुळे भविष्यात शिधापत्रिकाधारक रद्द करण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.कामांमध्ये त्याचबरोबर प्रशासनात पारदर्शकता यावी, याकरिता शासनाने पेपरलेस कारभारावर भार दिला आहे. त्यात संगणकीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांत माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग सुद्धा हायटेक करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्याचबरोबर वितरण व्यवस्थेतही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शासन करीत आहे. पनवेल तालुका विस्ताराने आणि लोकसंख्येने मोठा असून, या ठिकाणी रेशन कार्डधारकांची संख्या २,०४,६९६ इतकी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून या तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या संदर्भात प्रांताधिकारी भरत शितोळे, तहसीलदार दीपक आकडे व तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांनी सर्व दुकानदारांची बैठक घेऊन या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. असे असतानाही कार्डधारकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याने संगणकीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत. शिधापित्रका विविध ठिकाणी रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. शासकीय योजना, शालेय प्रवेशाकरिता हे कार्ड गरजेचे असते. त्यामुळे आपले कार्ड डिजिटल करण्याकरिता अर्ज भरून आधार कार्डची एक छायांकित प्रत संबंधित दुकानदाराकडे द्यावी, असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांनी केले आहे. (वार्ताहर)