शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिनींनी केला रायगडावरील हिरकणी कडा सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:02 IST

महिला दिनाचे औचित्य साधून शिलेदार संस्थेची मोहीम

ठळक मुद्देजनार्दन पानमंद यांच्या सहभागाने वाढला उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : आंतरराष्ट्रीय महिला दिनचे औचित्य साधून शिलेदार ॲडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी किल्ले रायगडवरील रौद्रभीषण हिरकणी कडा यशस्वी सर केला. या आरोहण मोहिमेचे आयोजन करून शिलेदार संस्थेच्या रणरागिणींनी रायगड किल्ल्यावरील हिरकणी कडा सर करून महिला दिन साजरा केला. यावेळी कर्जत तालुक्यातील दिव्यांग असलेले गिर्यारोहक जनार्धन पानमंद यांचा सहभाग महिलांना प्रेरणादायी असाच ठरला.

महिला दिनाचे औचित्य साधून ॲडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने खास महिलांसाठी रायगड वरील रौद्रभीषण हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन केले होते. किल्ले रायगड हिरकणी कडा सर करून सहभागी महिलांचा सन्मान देणारा आणि आपल्या लेकरासाठी तो अवघड बुरूज उतरून येणाऱ्या हिरकणी यांच्या कर्तृत्वला सलाम करणारा तसेच आदर व्यक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. मोहिमेत काही महिला सदस्या पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाल्या होत्या. मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वन विभागातील शीलाताई बडे याच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या महिला सहभागी झाल्या होत्या. आदिती व आर्या या लहान मुलीही मोहिमेत सहभागी होता. तसेच सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकारी नितीन पवार, रोहित जाधव यांच्यासह ५० महिला, पुरुष सदस्य या मोहिमेत सहभागी होते.

जनार्दन पानमंद यांच्या सहभागाने वाढला उत्साह    जन्मापासून एका पायाने दिव्यांग असणारे कर्जतचे जनार्दन पानमंद यांचा मोहिमेतील सहभाग सर्वांचा उत्साह वाढविणारा होता. या मोहिमेचे नेतृत्व शिलेदार संस्थेच्या महिला सदस्या कविता बोटाले, शीतल जाधव, अमिता सलियान आणि सिद्धी कदम या महिलांनी केले तर शिलेदार संस्थेचे प्रमुख गिर्यारोहक सागर विजय नलवडे, विनायक पुरी, प्रदीप मदने, सोपान, शैलेश जाधव, रजनीकांत, प्रीतम यांनी तांत्रिक मदत केली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKarjatकर्जत