शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कॉलनी बनली धोकादायक

By admin | Updated: October 13, 2016 04:13 IST

जुईनगरमधील रेल्वे कॉलनीला भूतबंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सांडपाणी साठविण्याच्या टाकीत बुधवारी म्हैस पडली. जानेवारीमध्ये टाकीत पडल्याने महिला गंभीर

नवी मुंबई : जुईनगरमधील रेल्वे कॉलनीला भूतबंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सांडपाणी साठविण्याच्या टाकीत बुधवारी म्हैस पडली. जानेवारीमध्ये टाकीत पडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. वारंवार अपघात होवूनही रेल्वे प्रशासन काहीच कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जुईगरमध्ये भव्य निवासी संकुल उभारण्यात आले आहे. पण येथील जवळपास ३५ इमारती धोकादायक झाल्या आहेत. यामधील काहींचे बांधकामही पूर्ण झालेले नाही. उरलेल्या इमारतीही जर्जर झाल्या असून कधीही कोसळू शकतात. वसाहतीमधील सांडपाण्याची वाहिनी महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीला जोडण्यात आली नाही. सांडपाणी वसाहतीमध्येच भूमिगत टाकीमध्ये साठविले जात आहे. या टाकीवरील स्लॅब जर्जर झाल्याने जानेवारीमध्ये एक महिला टाकीमध्ये पडून गंभीर जखमी झाली होती. यानंतर रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला. स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी खासदार राजन विचारे यांच्यासोबत रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले पण सहा महिन्यांत एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही. बुधवारी सकाळी रेल्वे कॉलनीमधील सांडपाणी साठविण्याच्या टाकीमध्ये म्हैस पडली. चार तासांच्या प्रयत्नानंतर म्हैस बाहेर काढण्यात यश आले. या खड्ड्यात पडून लहान मुले व नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता असल्याचे वारंवार सांगूनही प्रशासनाने कधीच दखल घेतली नव्हती. नागरिकांमधील असंतोष वाढल्याने बुधवारी तत्काळ टाकी बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. प्रशासनाने नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकाव्या अशी मागणी केली असून पुन्हा दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.