शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड महोत्सव म्हणजे गावची जत्राच!

By admin | Updated: January 25, 2016 02:43 IST

हाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाने रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली.

दासगाव(सिकंदर अनवारे) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाने रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली. पाचाड येथे तयार केलेली शिवसृष्टी म्हणजे केवळ दिखावाच होता. केवळ स्टॉल आणि स्टेज शो याव्यतरिक्त कोणतेच वेगळेपण नसल्याने हा महोत्सव म्हणजे गावची जत्राच असल्याची प्रतिक्रीया स्थानिक तसेच पर्यटकांतून उमटत होती. पाचाडमधील दुकानदार, हॉटेल व्यवसायीक तसेच या शिवसृष्टीतील स्टॉलधारकांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर उमटत होता. राजा शिव छत्रपती या मालिकेतील सेट उभे करून नितीन देसाई यांनी व्यवसाय केला आणि शासनाने पर्यटकांना उल्लु बनवले.गेली तिन दिवस चाललेल्या रायगड महोत्सवाला शेवटच्या दोन दिवसात प्रतिसाद मिळाला मात्र याठिकाणी आलेल्या प्रत्येक शिवप्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. आगाऊ बुकींगमुळे किल्ल्यावर जाणे शक्य नसल्याने पाचाड येथे प्रचंड गर्दी झाली. यामुळे कोंझर ते पाचाड या घाटात जवळपास एक तासाची वाहतुक कोंडी झाली. यामध्ये त्रस्त झालेल्या पर्यटकांना पाचाडमध्ये आल्यानंतर केवळ खाद्यपदार्थांच्या स्टॉल व्यतरीक्त कांहीच वेगळेपण न दिसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. याठिकाणी केवळ शस्त्रप्रदर्शनालाच रांगा लागल्या होत्या. याठिकाणी काढण्यात आलेली रांगोळी धुळ बसल्याने ही रांगोळी धुळीने काढलेली आहे का अशी स्थिती निर्माण झाली होती. या धुळीमुळे खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. यामुळे स्टॉलधारकांना अल्प प्रतिसाद मिळाला. तर किल्ले रायगडावरील बाजार पेठेत चिनी फेंगशुईच्या मुती, अष्टविनायाकातील गणपती मुर्ती, टीफीनचा पितळी डबा, रॉकेलवर चालणारा कंदील, हŸाीच्या सोंडेवरील झालर, आणि आजच्या काळातील मिठाई अशा वस्तु मांडण्यात आल्या होत्या. खरोखरच या वस्तु शिवकालात आणि राजधानीच्या बाजार पेठेत विक्रीसाठी होत्या का? असा प्रश्न पर्यटक करीत होते. याठिकाणी कांही सामाजीक संस्थांनी २० रूपयांची पाणी बाटली १० रूपयांत विकणे सुरू केले तर पाचाड ते रोप वे दरम्यान नितीन देसाई यंनी मोफत गाडी सुरू केली यामुळे स्थानिक व्यवसायीकांना याचा चांगलाच फटका बसला.केवळ स्टॉल व सायंकाळी होत असलेल्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण पाहता वेगळेपण असे काहीच नव्हते. परंतु महाड तालुक्यात शासनाने प्रथमच अशा प्रकारचा दिलेला मोठा कार्यक्रम व नितीन देसाईंच्या कलाप्रकारांचे आकर्षण यासाठी शनिवार - रविवार या दोन दिवसात रायगडमधील नागरीकांनी गर्दी केली होती. रायगड वगळता रस्त्यावर इतर जिल्हातील गाड्या दिसत नव्हत्या. शासनाचा कार्यक्रम असला तरी स्थानिकांना डावलून केलेल्या या कार्यक्रमात स्थानिक प्रशासनालाही कवडीमोल किंमत देण्यात आली. स्टेज शो असलेल्या ठिकाणी देखील ठेकेदाराच्या कामगारांचीच मनमानी होत असल्याने अनेक अधिकाऽयांना बाहेरून कार्यक्रम पाहण्याची पाळी आली.