शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: November 15, 2015 00:16 IST

सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे रहिवाशांना प्रदूषणापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊन एक तरुणाचा मृत्यूही झाला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे रहिवाशांना प्रदूषणापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊन एक तरुणाचा मृत्यूही झाला आहे. नागरिक त्रस्त असताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मात्र मौन धारण केले आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विविध कंत्राटे घेतली असल्यामुळेच सर्वांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. सिडकोने २०१३ मध्ये सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामास सुरुवात केली आहे. हार्बर मार्गावरील सर्वात भव्य इमारत उभारली जात आहे. परंतु सदर बांधकाम करताना प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी ठेकेदाराने घेणे आवश्यक आहे. परंतु काम पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्याचा कालावधी वगळता या परिसरात नियमित धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. धुळीतून वाहने गेल्यानंतर नागरिकांना श्वासही निट घेता येत नाही. याविषयी नागरिकांनी आवाज उठविला की ठेकेदाराकडून रोडवर पाणी मारले जाते. परंतु काही दिवसांनी पुन्हा दुर्लक्ष केले जाते. महापालिकेच्या पावसाळी गटारामध्ये पाणी सोडले जात असून त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांसाठी प्रसाधनगृहाचीही व्यवस्थित सोय नाही. दारावेगावाकडील प्रसाधनगृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचा मार्गही गैरसोयीचा आहे. अपंग नागरिकांना रेल्वे स्टेशनमध्ये ये - जा करताना खूपच त्रास होत आहे. रेल्वे स्टेशनचे व व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन परिसरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. डेंग्यूमुळे एक तरुणाचा मृत्यूही झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने अनेक वेळा नोटीस दिली परंतु प्रत्यक्षात काहीच कारवाई केलेली नाही. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही दौरा केला परंतु काहीही उपयोग झालेला नाही. अवजड वाहने रोडवर उभी केली जात असून एक मार्ग वाहतुकीसाठी अनेक वेळा बंद केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. नागरिक त्रस्त असताना लोकप्रतिनिधी मात्र या विषयावर गप्प बसून आहेत. छोट्याशा समस्यांसाठी आंदोलने करणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही या विषयावर आवाज उठवत नाहीत. परिसरातील नागरिकांनी सांगितले की अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विविध कामांचे ठेके घेतले आहेत. मजूर पुरवठा करण्यापासून साहित्याचा पुरवठा, डेब्रीज वाहतुकीपासून पाणी पुरवठ्यापर्यंत सर्व प्रकारचे साहित्य पुरविण्याचे काम परिसरातील राजकीय पदाधिकाऱ्यांना दिले आहे. समस्यांकडे दुर्लक्षसीवूड रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम सुरू असताना नागरिकांच्या समस्येकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत. लोकप्रतिनिधींनी कंत्राटे मिळवून पैसे कमाविण्यास सुरवात केली आहे. महापालिका, सिडको व पोलीस प्रशासनही नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतल्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.